स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी पाल्यांना सक्षम करूया...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

जळगाव - ‘जग बदलले आहे. नव्या जगाने नवीन आव्हाने उभी केली असून, स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी पालकांनी पाल्यांना सक्षम, सज्ज करण्यासाठी प्रयत्न करावेत,’ असे आवाहन ‘सकाळ’च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे कार्यकारी संपादक श्रीमंत माने यांनी केले.

जळगाव - ‘जग बदलले आहे. नव्या जगाने नवीन आव्हाने उभी केली असून, स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी पालकांनी पाल्यांना सक्षम, सज्ज करण्यासाठी प्रयत्न करावेत,’ असे आवाहन ‘सकाळ’च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे कार्यकारी संपादक श्रीमंत माने यांनी केले.

‘सकाळ’ खानदेश आवृत्तीच्या शुक्रवारी (११ ऑगस्ट) साजरा होणाऱ्या तेराव्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला आज कांताई सभागृहात सायंकाळी आयोजित कर्मचारी पाल्यांच्या गौरव सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी माजी आमदार मनीष जैन, निवासी संपादक विजय बुवा, युनिट मॅनेजर संजय पागे व्यासपीठावर होते. यावेळी श्री. माने म्हणाले, की सध्याचे तंत्रज्ञान युग आहे. तंत्रज्ञानाने जशा चांगल्या गोष्टी दिल्या, तशी आव्हानेही उभी केली आहेत. अभ्यासक्रमांत आमूलाग्र बदल झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक विश्‍वही बदलले आहे. या विश्‍वात जगाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी मुलांच्या ज्ञानाची व्याप्ती वाढली पाहिजे. त्यांना मराठी, हिंदी, इंग्रजीशिवाय अन्य भाषांचेही ज्ञान असले पाहिजे. मुले ‘स्मार्ट’ असली, तरी त्यांचे वाचन नाही. त्याकडेही पालकांनी विशेषत: मुलांच्या आईने काळजी घेतली पाहिजे. तत्पूर्वी, श्री. बुवा यांनी प्रास्ताविकात या कार्यक्रमामागची भूमिका मांडली.

पाल्यांचा गुणगौरव
सुरवातीला सयुरी कुळकर्णी या तरुणीने ‘गणाधीशाय...’ ही गणेशवंदना सादर केली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते कर्मचाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांचा भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. अमोल भट यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: jalgaon news sakal