'यिन': महाविद्यालयात मतदानासाठी रांगा; तरुणाईत उत्साह

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

जळगाव: लोकशाहीतील भविष्य असलेल्या युवकांचा मतदानासाठीचा उत्साह, उमेदवारांसह निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची लगबग, मतांसाठी प्रचाराची धावपळ अन्‌ मतदान प्रक्रिया सुरू होताच मतदारांच्या लागलेल्या रांगा हे सारे वातावरणात आज इलेक्‍शनची धुम पाहण्यास मिळाले. "यिन'मय वातावरणात लोकशाहीचा हा उत्सव साजरा करण्यासाठी महाविद्यालयीन तरुणाई रंगली असल्याचे चित्र शहरातील महाविद्यालयांमध्ये अनुभवास आले.

"यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' अर्थात "यिन'च्या लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रामअंतर्गत आज (ता.18) जळगाव शहरातील आठ महाविद्यालयांमध्ये लोकशाही पद्धतीने मतदान घेण्यात आले. यिन व्यासपीठांतर्गत जळगाव शहरात महाविद्यालयीन स्तरावर अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीची प्रक्रिया आज उत्साहात पार पडली. सकाळी नऊ वाजेपासून सुरू झालेली मतदान प्रक्रिया दुपारी बारापर्यंत चालली. यात विद्यार्थी ग्रुप- ग्रुपने येवून मतदान करत होते.

लांबच लांब रांगा
महाविद्यालय स्तरावर दरवर्षी निवडणूक प्रक्रिया राबविली जात असून, यंदाही ही प्रक्रिया पार पडली. त्यामुळे नव्या "यिनर्स'मध्ये या प्रक्रियेबद्दल उत्सुकता पाहण्यास मिळाली. सदर निवडणुक प्रक्रियेत मतदानासाठी महाविद्यालयात मतपेटी ठेवण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या उमेदवाराच्या नावापुढे खुण करून आपले मत पेटीत बंद केले. याकरीता विद्यार्थ्यांनी रांगा लावून मतदान केले. महाविद्यालयात आपल्या तासिक संपल्यानंतर मुला- मुलींचे ग्रुप मतदानस्थळी येवून आपल्या मतदानाचा हक्‍क बजावताना दिसत होते.

मतदानासाठी उमेदवारांमध्ये चुरस
राजकिय पटलावरील निवडणूक नसली, तरी महाविद्यालयीन स्तरावरील या निवडणूकीचा एक वेगळा अनुभव पाहण्यास मिळाला. महाविद्यालयांमध्ये प्रतिनिधीत्व करण्यासाठी उभ्या असलेल्या उमेदवारांमध्ये चुरस पाहण्यास मिळाली. प्रत्येक उमेदवार हा आवारात फिरून विद्यार्थ्यांना मतदान करण्याबाबत विचारणा करून आम्हाला मत द्या असा प्रचार करताना फिरत होते. नुतन मराठा, मु. जे. महाविद्यालयांमध्ये उमेदवारांना पाठींबा देणारे युवक- युवती देखील स्वतःहून क्‍लासरूममध्ये जावून विद्यार्थ्यांना मतदानस्थळी आणतानाचे चित्र होते. यामुळे महाविद्यालयांमध्ये आज एक वेगळ्या प्रकारचे वातावरण अनुभवण्यास मिळाले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Web Title: jalgaon news sakal collage student and yin election