जळगाव: एसटी कर्मचाऱ्यांच्या शंभर टक्के बंद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मच्यार्यांनी पुकारलेल्या संपामुळे प्रवशाचे हाल होत आहेत. मुक्कामाल गेलेल्या बस आगरात आल्या नंतर एक देखील बस सोडण्यात आली नाही. दिवाळी असल्याने खरेदीसाठी बाहेरून जळगावात येणाऱ्या नागरिकांची फजीती होत आहे.

जळगाव : एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागु करण्याच्या प्रमुख मागणी करीता मध्यरात्री पासून संप पुकारण्यात आला आहे. जळगाव विभागात शंभर टक्के बंद करण्यात आला असून मध्यरात्रीपासून कोणत्याही बस फेऱ्या सोडण्यात आल्या नाही.

राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मच्यार्यांनी पुकारलेल्या संपामुळे प्रवशाचे हाल होत आहेत. मुक्कामाल गेलेल्या बस आगरात आल्या नंतर एक देखील बस सोडण्यात आली नाही. दिवाळी असल्याने खरेदीसाठी बाहेरून जळगावात येणाऱ्या नागरिकांची फजीती होत आहे. परिणामी नागरिकांना खाजगी प्रवाशी वाहतूक करणाऱ्या वहनांचा आधार घ्यावा लागत आहे.

विभागातील साधारण 800 हुन अधिक बस उभ्या असल्याने स्थानिक व् लांब पल्ल्याच्या सकाळपासून आतापर्यंत 100 हुन अधिक फेऱ्या रद्द झाल्या आहेत. यामुळे एसटीच्या उत्पनावर देखील परिणाम झाला आहे.