महापालिका ‘स्थायी’चे आठ सदस्य निवृत्त

महापालिका ‘स्थायी’चे आठ सदस्य निवृत्त

जळगाव - महापालिका स्थायी समितीच्या १६ पैकी आठ सदस्य निवृत्त, तर महिला व बालकल्याण समितीचे पुनर्गठन केले जाणार आहे. नवीन सदस्यांच्या निवडीसाठी गटनेत्यांची बैठक आज महापौर ललित कोल्हे यांच्या दालनात झाली. तीत स्थायी समितीचे आठ सदस्य, तर महिला व बालकल्याण समितीच्या नऊ सदस्यांच्या नावांची चर्चा झाली.

महापौरांच्या दालनात आज दुपारी बैठक झाली. यावेळी खानदेश विकास आघाडीचे नेते रमेश जैन, गटनेते सुनील महाजन, भाजपचे गटनेते सुनील माळी, ‘जनक्रांती’चे सुनील पाटील उपस्थित होते. बैठकीत संख्याबळानुसार जागावाटप होणार आहे. खानदेश विकास आघाडी ४, भारतीय जनता पक्ष २, महाराष्ट्र नवनिर्माण सेना १, राष्ट्रवादी काँग्रेसला १ जागा असून, खानदेश विकास आघाडीकडे राष्ट्रवादी काँग्रेस व ‘जनक्रांती’ने अजून एक जागा मागितली आहे. 

तसेच महिला व बालकल्याण समितीचे पुनर्गठन आगामी महासभेत होणार असून, पक्षाच्या संख्याबळानुसार खानदेश विकास आघाडीकडे ४, मनसे २, भाजप २ व राष्ट्रवादी काँग्रेसला १ जागा असून, या जागांसाठीही गटनेत्यांनी चर्चा केली.

महासभेत होणार सदस्यांची नियुक्ती
महासभा मंगळवारी (२६ सप्टेंबर) होणार असून, सभेत स्थायी समितीसह महिला व बालकल्याण समितीच्या नवीन सदस्यांची निवड होणार आहे. स्थायी समितीच्या सदस्यांमध्ये खानदेश विकास आघाडीकडून ज्योती इंगळे, अमर जैन यांची नावे निश्‍चित असल्याचे समजते, तर राष्ट्रवादी काँग्रेस, जनक्रांतीने यांनी एक-एक जागा मागितली आहे. तसेच मनसेतर्फे अनंत जोशी यांना पुन्हा संधी, तर भाजपतर्फे ज्यांना संधी मिळाली नाही, त्यांना ती दिली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

स्थायी समितीची आज सभा
स्थायी समितीची सभा उद्या (२२ सप्टेंबर) सकाळी अकराला सभापती डॉ. वर्षा खडके यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. सभेत तीन विषयांवर चर्चा होणार असून, त्यावर निर्णय घेतला जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com