जळगाव: पत्नीचा खून करून पतीची रेल्वेखाली आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

जळगाव: पती-पत्नीमध्ये नेहमी वाद उद्‌भवत असत, गुरूवारी दुपारी आणि रात्री झालेल्या भांडणात पतीने पत्नीचा गळा दाबून खून केल्याची घटना रात्री साडेअकराच्या सुमारास उघडकीस आली. पत्नीचा खून केल्यानंतर फरार झालेल्या पतीने देखील रेल्वेखाली आत्महत्या केल्याचे आज (शुक्रवार) दुपारी बाराच्या सुमारास उघडकीस आले आहे. सदर घटना आसोदा येथे घडली आहे.

जळगाव तालुक्‍यातील आसोदा येथील धनजीनगर येथे वास्तव्यास असलेल्या योगेश गौतम बिऱ्हाडे याच्यासोबत शिरसोली येथील माहेर असलेल्या सिमा योगेश बिऱ्हाडे (वय 25) हिच्यासोबत चार वर्षापुर्वी विवाह झाला होता. सिमा ही दोन महिन्यांची गर्भवती होती. दारू पिवून वाद घालणे आणि पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेवून योगेश हा सिमाला नेहमी मारहाण करत असे. यातूनच गुरूवारी रात्री पती योगेश गौतम बिऱ्हाडे याने गळा दाबून खुन केल्याचे उघडकीस आले. दारू पिवून योगेश बिऱ्हाडे हा सिमा बिऱ्हाडे यांच्यासोबत भांडण करत असे. यात गुरूवारी (ता.14) दुपारी गावातील ग्रामपंचायत कार्यालयाच्या परिसरात देखील दोघांमध्ये वाद होवून योगेशने पत्नी सिमा हिस मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच रात्री देखील घरात देखील दोघांमध्ये भांडण झाले. यात योगेशने सिमाचा गळा दाबून खून केला. यानंतर तो जळगावी गेल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले होते. ही घटना उघडकीस आल्यानंतर ग्रामस्थांनी सिमा हिस रात्री साडेअकराच्या सुमारास जिल्हा रूग्णालयात आणले असता, डॉक्‍टरांनी मृत घोषित केले.

रेल्वे ट्रॅकवर सापडला योगेशचा मृतदेह
पत्नी सिमा हिला मारल्यानंतर योगेश हा जळगावच्या दिशेने आल्याने ग्रामस्थांनी पाहिले होते. दरम्यान, योगेशने सदर घटनेची माहिती मेहुणे यांना दिली होती. यावेळी त्याचे मेहुणे योगेशला पोलिस स्टेशनला घेवून येत असताना दुचाकीवरून मागच्या मागे उतरून योगेश फरार झाला होता. पोलिस त्याचा शोध घेत असताना आज दुपारी बाराच्या सुमारास आसोदा रेल्वेगेट जवळील ट्रॅकवर योगेशचा मृतदेह आढळून आला. सदर घटनेचा पुढील तपास सुरू आहे.