अपर वैतरणा धरण भरले शंभर टक्के 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

इगतपुरी - मुंबईला पाणीपुरवठा करणारे अपर वैतरणा धरण शंभर टक्के भरले असून, धरणाचा एक दरवाजा दोन फुटांनी उघडला आहे. त्यातून ५५० क्‍यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. अपर वैतरणा धरण जुलैमध्येच भरल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

वैतरणा धरण परिसरात आठ दिवसांपासून पाऊस सुरू आहे. वैतरणा धरण दर वर्षी ऑगस्टच्या शेवटी भरते. मात्र, या वर्षी जुलैतच भरले आहे. त्यामुळे मुंबईकरांचा पाण्याचा प्रश्‍न मिटला आहे. 

वैतरणा परिसरात भात आवणीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. वैतरणा परिसर पावसाळ्यात पर्यटकांना चांगलीच भुरळ पाडत असतो. आठ दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेने नदी-नाले दुथडी भरून वाहू लागल्याने वातावरण मनमोहक बनले आहे. धरण क्षेत्रात पर्यटकांची मांदियाळी सुरू आहे.

Web Title: jalgaon news Vaitarna Dam