मेहुणबारे (ता. चाळीसगाव, जळगाव) : दरेगाव रस्त्यालगत असलेल्या वरखेडे शिवारात आज (बुधवार) दुपारी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला आहे.
वरखेडे (ता. चाळीसगाव) येथील रहिवासी जीभाऊ बारकू जगताप यांची सून दीपाली नारायण जगताप (वय 25) या त्यांच्या दरेगाव रस्त्यालगत असलेल्या शेतात कापूस वेचणी करत होत्या. त्या दरम्यान दुपारी दोनच्या सुमारास बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. बिबट्याने त्यांच्या मानेवर नखांनी वार केले. शिवाय पायचा भाग खाल्ला. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, अद्यापही घटनास्थळी वन विभागाचे कर्मचारी दाखल नव्हते. मात्र, मेहुणबारे पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक नजीम शेख यांनी घटनास्थळी धाव घेतली.
'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.