कर्जमाफीच्या जाचक अटींविरुध्द रस्त्यावर वृक्षासन करून निषेध

योगेश महाजन
बुधवार, 21 जून 2017

अमळनेर (जळगाव): आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्‍वभुमीवर राज्य किसान सभा व शेतकरी कामगार पक्षातर्फे येथील बळीराजा चौकात आज (बुधवार) दुपारी एकच्या सुमारास वृक्षासन करून राज्य शासनाचा निषेध करण्यात आला.

कर्जमाफीच्या जाचक अटी व अध्यादेशाच्या परिपत्रकाच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी परिपत्रकातील उपस्थितांनी होळी केली. आंदोलनात किसान सभेचे कार्याध्यक्ष शिवाजी पाटील, ज्ञानेश्‍वर पाटील, विजय पाटील, अमोल पिंगळे, किशोर सूर्यवंशी, सुरेश पाटील, भैय्या पाटील, किरण पाटील आदींसह सुमारे पन्नास कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते. यावेळी तहसीलदार प्रदीप पाटील यांना निवेदन देण्यात आले.