जळगाव जिल्हा बॅंकेचे २१० कोटी वर्ग होणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 जून 2017

जळगाव - जिल्हा सहकारी बॅंकांकडील जुन्या नोटा स्वीकारण्यास रिझर्व्ह बॅंकेने मान्यता दिल्यानंतर जळगाव जिल्हा सहकारी बॅंकेतील २१० कोटींची रक्कम मोकळी होणार आहे. असे असले तरी बॅंकेने खरीप हंगामासाठी राज्य बॅंकेकडून निधीची उचल केलेली असल्याने याही २१० कोटींची रक्कम राज्य बॅंकेकडे परस्पर वर्ग होणार आहे. 

नोटाबंदीच्या काळात जिल्हा सहकारी बॅंकांकडे जमा झालेल्या जुन्या चलनातील रक्कम स्वीकारण्यास रिझर्व्ह बॅंकेने नकार दिला होता. त्यामुळे जिल्हा सहकारी बॅंकांकडे मोठ्या प्रमाणात रक्कम जमा झाली. मात्र, ती पडून असल्याने बॅंकांच्या आर्थिक स्थितीत आणखीच अडचण आली होती. आता रिझर्व्ह बॅंकेने जिल्हा बॅंकांना पत्र पाठवून ही रक्कम तीस दिवसांत रिझर्व्ह बॅंकेकडे जमा करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे जळगाव जिल्हा बॅंकेलाही दिलासा मिळाला आहे. बॅंकेकडे पडून असलेली २१० कोटींच्या जुन्या चलनातील रक्कम यामुळे मोकळी होईल. दरम्यान, बॅंकेने राज्य बॅंकेकडून पीककर्ज वाटपासाठी सुमारे साडेपाचशे कोटींची उचल घेतली होती, त्यामुळे रिझर्व्ह बॅंकेकडे जमा होणारी २१० कोटींची रक्कम आता थेट राज्य बॅंकेकडे या उचलीपोटी वर्ग होणार आहे.