बारा दिवसांत फक्त ५ टक्के पाऊस

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 ऑगस्ट 2017

जिल्ह्यात जुलैअखेर सरासरी ३८.५ टक्के पाऊस; खरीप हंगाम संकटात
जळगाव - जिल्ह्यात आजअखेर २५४.९ मिलिमीटर (सरासरी ३८.५ टक्के) पाऊस झाला. ३१ जुलैपासून आजपर्यंत बारा दिवसांत केवळ पाच टक्के पाऊस पडला. हाच पाऊस ३१ जुलैअखेर २३३.९ मिलिमीटर (३८ टक्के) झाला.

जिल्ह्यातील पावसाची सरासरी ६६३.३ मिलिमीटर आहे. पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांवर संक्रांत ओढवली असून, विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे यंदा खरीप हंगाम संकटात आला असून, शेतकरी पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत.

जिल्ह्यात आजअखेर सर्वाधिक पाऊस (५८.२ टक्के) पारोळा तालुक्‍यात झाला; तर सर्वांत कमी (२६.४ टक्के) पाऊस अमळनेर तालुक्‍यात झाला.

पिकांना ‘चूहा’ पाणी देण्याची वेळ
पावसाने गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून ओढ दिली. त्यामुळे उडीद, मूग आदी पिके करपू लागली आहेत. अनेक पिकांवर पानअळ्यांचा प्रादुर्भाव झाला आहे. पिकांवरील कीड नष्ट होण्यासाठी शेतकरी विविध जंतुनाशकांची फवारणी करीत आहेत. सोबतच पिकांची वाढ होऊन फूल धारणा होण्यासाठी शेतकरी आपल्याकडील पाणी ‘चूहा’ पद्धतीने देत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून दिवसा उन्हाची तीव्रता वाढली असून दुपारी उन्हाचा कडका जाणवत आहे. मात्र, तरीही पाऊस पडत नाही. पाऊस पडावा, यासाठी शेतकरी प्रार्थना करताना दिसून येत आहेत.

Web Title: jalgav news 5% rain in 12 days