जळगाव जिल्ह्यात दोन वर्षांतील थकबाकी आठ हजार कोटींवर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 जून 2017

जिल्हा बँकेची स्थिती - ३१ मार्चअखेर ७१३ कोटींची पीककर्ज फेड

जळगाव - जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे विविध वित्तीय संस्थांची गेल्या दोन वर्षांतील जवळपास ८ हजार ८२८ कोटींची येणे बाकी व थकबाकी असल्याची माहिती समोर आली आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या निर्णयासाठी शासनाने गेल्या दोन-तीन वर्षांतील पीककर्ज वाटप, वसुलीच्या स्थितीचा आढावा जिल्हानिहाय मागविला असून त्या माध्यमातून एकत्रित माहिती संकलित केल्यानंतर या हजारो कोटींच्या थकबाकी व येणे बाकीचे आकडे समोर आले आहेत. 

दरम्यान, या सर्व आकडेवारीसह विस्तृत अहवाल जिल्हा प्रशासनाने शासनाकडे नुकताच पाठविला आहे. तर दुसरीकडे ३१ मार्च २०१७ अखेर ७१३ कोटींच्या कर्जाची परतफेड जिल्हा बॅंकेकडे करण्यात आली आहे. शासनाला कर्जमाफी करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे गेल्या दोन वर्षात किती येणे आहे, थकबाकी आहे याची माहिती शासनाने जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून मागितली होती. शुक्रवार ते रविवार असे तीन दिवस रात्री उशिरापर्यंत काम करून जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तालुक्‍यातील अधिकाऱ्यांकडून माहिती संकलित केली होती.