प्रभारी महापौर कोल्हेंकडून शहर विकासाची ग्वाही

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

जळगाव - खानदेश विकास आघाडीचे नेते व माजी आमदार सुरेशदादा जैन यांनी ‘मनसे’ला महापौरपद देण्याचा दिलेला शब्द पाळला आहे. त्यांच्या आदेशानुसारच आपण विकासकामे करणार आहोत, अशी प्रतिक्रिया ‘मनसे’चे नेते व प्रभारी महापौर ललित कोल्हे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

महापौर नितीन लढ्ढा यांनी राजीनामा दिल्यामुळे उपमहापौर म्हणून प्रभारी महापौरपदी कोल्हे यांच्याकडे आले आहे. आज ते मुंबईत होते, त्यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता ते म्हणाले, खानदेश विकास आघाडीला आम्ही सत्तेत साथ दिली आहे. महापौरपदाची निवडणूक लागल्यानंतर आपण रीतसर अर्ज दाखल करणार आहोत. उपमहापौर असल्याने  प्रभारी महापौरपद आपल्याकडेच असल्याने आपण आज जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्तांशी चर्चा केली आहे. 

महापौरपद मनसेकडे आल्यानंतर आपण विकासाचे काम आहे तसेच पुढे सुरू ठेवणार आहोत. शहरातील स्वच्छता तसेच विकासाला प्राधान्य देणार आहोत. या कामांसाठी नितीन लढ्ढांचीही साथ घेऊ. सर्वांना सोबत घेऊन शहराचा विकास साधण्याचा प्रयत्न करु, असे ते म्हणाले.