नैराश्‍य, भीती, ताणतणाव घडवितात ‘आत्महत्या’

धनश्री बागूल
रविवार, 10 सप्टेंबर 2017

देशात दर ४० सेंकदांमागे एक आत्महत्या; जनजागृती, समुपदेशनाची गरज
जळगाव - नैराश्‍य, ताणतणाव, आजारपण, भीती, चिंता यांसारख्या मानसिक आरोग्याशी निगडित असलेल्या या गोष्टी आत्महत्येस कारणीभूत ठरत असून, जगभरात आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. जगात दरवर्षी आठ लाख आत्महत्या होत आहेत. त्यात एक लाख लोकसंख्येमागे १६ लोक, तर प्रत्येक ४० सेकंदाला एक आत्महत्या होत असल्याचे दिसून येत आहे. हे प्रमाण रोखण्यासाठी आत्महत्येसंदर्भात जनजागृती करण्याची गरज असल्याचे मत मानसोपचार तज्ज्ञांनी व्यक्त केले.

सध्या आपण दररोज आत्महत्येच्या बातम्या वृत्तपत्राच्या माध्यमातून वाचत असतो. या घटना कमी करण्यासाठी गेल्या पंधरा वर्षांपासून १० सप्टेंबर हा दिवस जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन म्हणून मानला जातो. आजकाल अनेकदा पालक व मुले यांच्यात संवाद होत नाही, त्यामुळे मुलांना काही ताणतणाव व नैराश्‍य आल्यास ते आपल्या पालकांशी बोलू शकत नाही.

त्यातूनच ते आत्महत्येचे पाऊल उचलतात. आत्महत्या करण्याचे सर्वाधिक प्रमाण हे तरुणांचे आढळून आले आहे. आजकाल तरुण मुले, मुली ही व्यसनांच्या आहारी जात आहे. त्यांच्यात संयम राहिलेला नाही. पालकांनी जर मुलांना रागविले, अथवा कोणाचा प्रेमभंग झाला तरी मुले लगेच आत्महत्या करतात. कोणत्याही गोष्टींवर विचार न करता आज तरुणाई दुसऱ्याच्या आत्महत्येला सकारात्मक घेत आहे. यासाठी समाजात जनजागृती करणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्‍त केले आहे.

पालक व मुले यांच्यातील संवाद हरपला आहे. मुलगा जर ताणतणावात असेल तर पालक हे समाजाच्या भीतीने त्याला मानसोपचार तज्ज्ञांकडे घेऊन जात नाही. मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेणे म्हणजे तो वेडा आहे, असे अजिबात नाही. समाजाच्या भीतीपोटी लोक मुलांच्या आजाराकडे दुर्लक्ष करत आहे, त्यातूनच आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे.
- डॉ. दिलीप महाजन (मनोविकार तज्ज्ञ) 

कौटुंबिक समस्यांमुळे सर्वाधिक आत्महत्या
देशात वेगवेगळ्या कारणांसाठी आत्महत्या होतात. त्यात कौटुंबिक समस्या २७.६ टक्के, इतर कारणे २६.२ टक्के, आजारपण १५.८ टक्के, नैराश्‍य व ताणतणाव १२.१ टक्के, वैवाहिक समस्या ४.८ टक्के, प्रेम प्रकरणे ३.३ टक्के, कर्जबाजारी ३.३ टक्के, व्यसनाधीनता २.७ टक्के, बेरोजगारी २ टक्के, परीक्षेतील अपयश २ टक्के इतक्‍या प्रमाणात आत्महत्येची कारणे आहे. यात सर्वाधिक आत्महत्या या कौटुंबिक समस्यांमुळे होत असल्याचे दिसून येते. 

ही आहेत आत्महत्येची प्रमुख कारणे
कौटुंबिक समस्या
जुनाट आजार, व्यसनाधीनता
प्रेमभंग अथवा एकतर्फी प्रेम
मानसिक आजार, नैराश्‍य
आर्थिक परिस्थिती, बेकारी, गरिबी
हुंडाबळी, कौटुंबिक वाद
समाजातील बदनामी

आत्महत्या रोखण्यासाठी उपाय
आत्महत्येसंदर्भात समाजात जनजागृती करणे
व्यसनांपासून दूर राहणे
शाळा, महाविद्यालयांत समुपदेशक नेमणे
कौटुंबिक हिंसाचार थांबवणे
सकारात्मक जीवनशैली अंगीकारणे
कौटुंबिक संवाद वाढविणे

Web Title: jalgav news depression fear stress create suicide