अकरावी प्रवेश अर्जाचा आज शेवटचा दिवस

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 जून 2017

जळगाव - दहावीच्या विद्यार्थ्यांना गुणपत्रक देण्यात आल्यानंतर मंगळवारपासून शहरात अकरावी प्रवेशाला सुरवात झाली. यंदा शिक्षण विभागातर्फे विज्ञान शाखेचे प्रवेश हे गुणवत्तेनुसार करण्याचे आदेश आल्याने विद्यार्थ्यांना पाच दिवस अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली होती. अर्ज करण्याचा उद्या (ता. २९) शेवटचा दिवस असल्याने आज महाविद्यालयांत विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

यंदा दहावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी वाढली असल्याने शिक्षण विभागाने गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे आदेश काढले आहे. यानुसार शहरातील सर्व महाविद्यालयात उद्या (ता.२९) प्रवेश अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज महाविद्यालय परिसरात विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे वेळेवर उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे अधिक हाल होत आहे.

३ जुलैला पहिली यादी
विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांकडून अर्ज जमा झाल्यानंतर शहरातील प्रमुख नूतन मराठा महाविद्यालय, मू.जे. महाविद्यालय, धनाजीनाना महाविद्यालय, बेंडाळे महाविद्यालयात ३ जुलैला पहिली मेरिट लिस्ट जाहीर केली जाणार असल्याची माहिती महाविद्यालयांतर्फे देण्यात आली आहे.  

महाविद्यालयांतर्फे सुविधा
सध्या सर्वच विभागांच्या प्रवेश प्रक्रिया सुरू असल्याने विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी गर्दी केली आहे. परंतु अनेक विद्यार्थी हे ग्रामीण भागातून येतात व अथवा नव्याने प्रवेश घेत आहेत, अशा विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती देण्यासाठी महाविद्यालय परिसरात सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे.

यंदा दहावीच्या निकालाची टक्केवारी वाढली असल्याने विज्ञान शाखेचे प्रवेश ८० टक्‍क्‍यांवर बंद होऊ शकतील. गेल्या दोन दिवसांपासून अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज जमा झाल्याने प्रवेश लवकरच ‘फुल्ल’ होतील.
- डॉ. एल. पी. देशमुख (प्राचार्य, नूतन मराठा महाविद्यालय)