शेतकऱ्यांचे ‘वृक्षासन’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 जून 2017

जळगाव/ अमळनेर - दहा हजारांची मदत देण्याबाबत शासनाने काढलेल्या अध्यादेशातील निकष व्यवहार्य नसल्याने शासनाच्या निषेधार्थ शेतकरी आंदोलन समितीने आज जिल्ह्यात काही ठिकाणी आंदोलन केले. अमळनेर येथे शेतकऱ्यांनी योग दिनाचे औचित्य साधत शासनाचा निषेध म्हणून ‘वृक्षासन’ केले, तर चोपड्यात दहा हजार रुपये मदत देण्याबाबत अध्यादेशाची होळी केली. या आंदोलनाने अमळनेर शहरवासीयांचे लक्ष वेधले होते. 

जळगाव/ अमळनेर - दहा हजारांची मदत देण्याबाबत शासनाने काढलेल्या अध्यादेशातील निकष व्यवहार्य नसल्याने शासनाच्या निषेधार्थ शेतकरी आंदोलन समितीने आज जिल्ह्यात काही ठिकाणी आंदोलन केले. अमळनेर येथे शेतकऱ्यांनी योग दिनाचे औचित्य साधत शासनाचा निषेध म्हणून ‘वृक्षासन’ केले, तर चोपड्यात दहा हजार रुपये मदत देण्याबाबत अध्यादेशाची होळी केली. या आंदोलनाने अमळनेर शहरवासीयांचे लक्ष वेधले होते. 

शेतकऱ्यांच्या अभूतपूर्व आंदोलनानंतर शासनाने कर्जमाफीचा निर्णय जाहीर केला असला, तरी त्याचा प्रत्यक्षात लाभ अद्याप शेतकऱ्यांना मिळालेला नाही. हंगाम तोंडावर असताना शेतकऱ्यांकडे निधी नसल्याने शासनाने त्यावर उपाय म्हणून दहा हजारांची तातडीची मदत देण्याबाबत अध्यादेश काढला. मात्र, त्यातील निकष व्यवहार्य नसल्यामुळे शेतकरी सुकाणू समितीने या अध्यादेशाला विरोध केला. या अध्यादेशातील निकषांमुळे केवळ वीस टक्केच शेतकरी या मदतीसाठी पात्र ठरू शकत असल्याने शेतकरी समितीने या अध्यादेशास विरोध करत त्याची होळी करण्याचे ठरवले. त्यानुसार आज अमळनेर येथे शेतकऱ्यांनी अध्यादेशाची होळी करत शासनाविरोधात निदर्शने केलीत. चोपड्यातही अध्यादेशाची होळी करण्यात आली. या आंदोलनात अनेक शेतकरी सहभागी झाले.  बळीराजा चौकात आंदोलन करून शासन विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी शासनाच्या कर्जमाफीच्या अध्यादेशाच्या परिपत्रकांची होळीही केली. किसान सभेचे कार्याध्यक्ष शिवाजी पाटील, गोकूळ बोरसे, नरेंद्र पाटील, ज्ञानेश्‍वर पाटील, विजय पाटील, अमोल पिंगळे, किशोर सूर्यवंशी, सुरेश पाटील, भय्या पाटील, किरण पाटील आदींसह सुमारे पन्नास कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते. त्यानंतर तहसीलदार प्रदीप पाटील यांना निवेदनही देण्यात आले. घोषणाबाजीने परिसर दुमदुमला होता.

दरम्यान, दोन-तीन टप्प्यात हे आंदोलन सुरू राहणार असून गुरुवारी (ता.२२) भडगाव, जळगाव, यावल, पारोळा येथील तहसील कार्यालयांवर निदर्शने, अध्यादेशाची होळी या स्वरूपात आंदोलन होणार आहे.

उत्तर महाराष्ट्र

पिलखोड(ता. चाळीसगाव) : येथील वीज उपकेंद्रातर्गत वीजजोडणी असलेल्या सोळापैकी तेरा ग्रामपंचायतींचे वीजबिल थकले आहे. त्यामुळे या सर्व...

10.39 AM

मेहुणबारे ता.चाळीसगाव : धुळेकडुन चाळीसगावकडे जाणाऱ्या  दुचाकीस्वरास अज्ञात वाहनाने चिंचगव्हाण फाट्याजवळ जोरदार धडक दिली....

08.06 AM

नाशिक : वाढदिवसाच्या रात्रीच नवविवाहितेस बळजबरीने विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न सुंदरपुर (ता निफाड) येथे घडला. प्रियंका...

08.00 AM