आता विक्रीकर नव्हे; वस्तू- सेवाकर विभाग!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 जून 2017

यंत्रणा तीच; कामाचे स्वरूप बदलणार 
एक जुलैला ‘जीएसटी’ स्वागत सोहळा

जळगाव - केंद्र सरकारने एक जुलैपासून वस्तू- सेवाकर अर्थात ‘जीएसटी’ लागू करण्यासंदर्भात निर्णय घेतल्यानंतर आता विक्रीकर विभागाचे व या विभागातील कामाचे स्वरूपही बदलणार आहे. विक्रीकर विभाग आता ‘वस्तू व सेवाकर विभाग’ म्हणून नावारूपास येणार असून, या शासकीय विभागाच्या कार्यालयीन परिसराचे नामकरण एक जुलैला छोटेखानी कार्यक्रमात करण्यात येणार आहे.

केंद्र सरकारतर्फे संपूर्ण देशभरात ‘एक करप्रणाली’ लागू करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार एक जुलैपासून देशभरात विक्रीकर, व्हॅट, अन्य वेगवेगळ्या स्वरूपाचे कर, अधिभार हे सर्व प्रकार बाद होऊन एकच वस्तू व सेवाकर अर्थात ‘जीएसटी’ लागू होणार आहे. त्यासंबंधी संसदेत कायदा संमत करण्यात आला असून, या कायद्यावर राष्ट्रपती ३० जूनला स्वाक्षरी करतील व एक जुलैपासून देशभरात ‘जीएसटी’ लागू होईल. विक्रीकर व अन्य विभागांतही काही बदल होणार आहेत. विक्रीकर विभाग आता ‘वस्तू व सेवाकर विभाग’ म्हणून नावारूपास येणार असून, ‘जीएसटी’च्या दृष्टीने विभागाच्या कार्यालयीन कामकाजाच्या स्वरूपातही काही बदल होणार आहेत.

आतापर्यंत अप्रत्यक्ष कराच्या कक्षेत विक्रीकर, व्हॅट आदींचे कामकाज विक्रीकर भवनातूनच चालत होते. आता हे विभाग बाद होणार नाहीत. मात्र, त्यांच्यावर ‘जीएसटी’ आकारणीची जबाबदारी असेल. या नव्या कर आकारणीसाठी विक्रीकर विभागाची यंत्रणा तीच राहील. मात्र, कर आकारणीचे स्वरूप बदलणार असल्याने व्यावसायिकांच्या नोंदणीपासून कर आकारणीपर्यंतचे कामकाज पार पाडण्यासाठी आवश्‍यक ते तांत्रिक सहाय्य या विभागाला पुरविण्यात येणार आहे. 
 
‘वस्तू, सेवाकर भवना’चे नामकरण
‘जीएसटी’ लागू होण्याच्याच अनुषंगाने जळगावातील विक्रीकर विभागाचे ‘विक्रीकर भवन’ म्हणून परिचित असलेले कार्यालय आता ‘वस्तू व सेवाकर भवन’ या नावाने ओळखले जाईल. या भवनाचे नामकरण व ‘जीएसटी’ प्रणालीचा स्वागत सोहळा एक जुलैला सकाळी अकराला होणार आहे.