‘मनपा’ कर्मचाऱ्यांना आता हेल्मेटसक्ती

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जुलै 2017

जळगाव - महापालिकेत मोटारसायकलवर येणाऱ्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना हेल्मेट तर चारचाकीत येणाऱ्यांना सीटबेल्ट वापरण्याचे आदेश आज उपायुक्‍त चंद्रकांत खोसे यांनी दिले. आदेशाचे उल्लंघन केल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. 

उपायुक्त खोसे यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये वाहतुकीदरम्यान होणाऱ्या अपघातात जीवितहानी टाळण्यासाठी हेल्मेट व सीटबेल्ट सक्ती केली आहे. याबाबत लवकरच पोलिस दल व उप प्रादेशिक परिवहन विभागाकडून संयुक्त मोहीम राबवून कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे महापालिकेत देखिल अधिकारी व कर्मचारी यांना हेल्मेट व सीटबेल्ट सक्ती केली आहे. महापालिकेत मोटारसायकल आणताना हेल्मेट तर चारचाकीत येणाऱ्यांना सीटबेल्ट लावणे बंधनकारक आहे. जे कर्मचारी नियमाची अंमलबजावणी करणार नाहीत. त्यांना महापालिकेत प्रवेश देणार नाही तसेच त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचेही आदेशात म्हटले आहे.