नेतृत्वविकासासाठी झाली तरुणाई सज्ज!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

‘यिन’ निवडणुकीतील विजेत्यांचा जल्लोष; उत्कंठावर्धक ठरली मतमोजणी

जळगाव - मतपेटीत बंद झालेले भाग्य कधी उघडणार याची लागलेली उत्सुकता अन्‌ उत्कंठा...मतपेटीतून एकएक मत काढले जात असताना होणारी धाकधूक... कोण जिंकणार, याबाबत मनावर असलेला ताण व काहीशी भीती अन्‌् निकाल लागल्यानंतरचा तितकाच उत्साह... असेच वातावरण ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’द्वारे महाविद्यालयांत झालेल्या निवडणुकीच्या निकालादरम्यान आज अनुभवायला मिळाले. शुक्रवारी (१८ ऑगस्ट) मतदान झाल्यानंतर आज निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि महाविद्यालयातील तरुणाई या निवडणुकीच्या माध्यमातून नेतृत्वविकासासाठी सज्ज झाली आहे.

‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ अर्थात ‘यिन’च्या माध्यमातून शुक्रवारी नेतृत्व विकास कार्यक्रमांतर्गत शहरातील आठ महाविद्यालयांमध्ये घेण्यात आलेल्या महाविद्यालयीन स्तरावर अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीकरिता झालेल्या निवडणुकीची आज मतमोजणीची प्रक्रिया पार पडली. ‘सकाळ’च्या औद्योगिक वसाहतीतील कार्यालयात सकाळी दहाला मतमोजणीला सुरवात झाली. मतमोजणी अधिकारी म्हणून प्रा. जयेंद्र लेकुरवाळे, विशाखा देशमुख यांनी काम पाहिले. निकालासाठी उमेदवारांची सकाळपासूनच उपस्थिती होती. उत्सुकता शिगेला पोचली होती. निकाल लागेपर्यंत कोण जिंकणार याचा तणाव उमेदवारांच्या चेहऱ्यावर होताच, पण सर्वच महाविद्यालयांचा निकाल घोषित झाल्यानंतर सर्वांनी एकत्रित येऊन जल्लोष केला.

‘हिप हिप.. हुर्रे...’ करत गुलालाची उधळण
दोन दिवसांपूर्वी पार पडलेल्या मतदान प्रक्रियेनंतर निवडणुकीच्या निकालाबद्दल उमेदवारांसह मतदारांमध्येही उत्सुकता होती. उमेदवारांसोबत विद्यार्थी कार्यकर्ते देखील मतमोजणीच्या ठिकाणी उपस्थित होते. एक- एक महाविद्यालयाचा निकाल जाहीर करताना विजेत्यांची नावे घोषित होताच एकच जल्लोष केला जात होता. संपूर्ण निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये विजयोत्सवाचा रंग अधिकच भरला. विजयी मित्राला, उमेदवाराला उचलून घेत, गुलाल- फुलांची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला. 

महिला महाविद्यालयातून सर्वाधिक मतदान
शहरातील एकूण आठ महाविद्यालयांमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडली होती. या प्रक्रियेत बेंडाळे महिला महाविद्यालयातून सर्वाधिक ९२० मतदान झाले. या खालोखाल मू. जे. महाविद्यालयात ७६२ मतदान झाले. बेंडाळे महिला महाविद्यालयातून सायली जाधव हिला सर्वांत जास्त ५४७ मते पडली. तर नूतन मराठा महाविद्यालयातून पियुष पाटील हा सर्वाधिक ३६६ मतांनी विजयी राहिला. तर रायसोनी इन्स्टिट्यूटमधून विशाल वाणी याची बिनविरोध निवड झाली.

विजयी उमेदवार
नूतन मराठा महाविद्यालय - अध्यक्ष- पियुष पाटील, उपाध्यक्ष- मिलिंद साठे, बेंडाळे महिला महाविद्यालय - अध्यक्ष- सायली जाधव, उपाध्यक्ष- निकिता राजपूत, मू. जे. महाविद्यालय - अध्यक्ष- सागर जाधव, उपाध्यक्ष- तुषार पाटील, एसएसबीटी महाविद्यालय ः अध्यक्ष- शुभम बेंडाळे, उपाध्यक्ष- रोहन भावसार, गुलाबराव देवकर महाविद्यालय - अध्यक्ष- ऋषिकेश सैंदाणे, उपाध्यक्ष- शुभम बारसे, रायसोनी इन्स्टिट्यूट - अध्यक्ष- विशाल वाणी, उपाध्यक्ष- तुलशंद हिवाळे, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ - अध्यक्ष- विजय पाटील, उपाध्यक्ष- अंकित कासार, उल्हास पाटील अँग्री महाविद्यालय - अध्यक्ष- हेमंत पोतदार, उपाध्यक्ष- गिरीश महाजन.