निसर्गाच्या सान्निध्यात रमायचंय? ‘लांडोरखोरी’त या... - आदर्श रेड्डी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

जळगाव - वन विभागाने मोहाडी रस्त्यावर लांडोरखोरी उद्यानाची निर्मिती केली आहे. नागरिकांसाठी व निसर्गाचा सान्निध्य हवा असणाऱ्यांसाठी पर्वणीच असल्याची माहिती उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 

सहाय्यक वनसंरक्षक एस. आर. पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी एन. जी. पाटील उपस्थित होते. नैसर्गिक वातावरणात असलेल्या या उद्यानात सकाळी जॉगिंग करून अत्याधुनिक यंत्राच्या साहाय्याने व्यायामही करता येईल. विविध प्रकारच्या वनौषधींचीही पाहणी करता येईल. मुलांसाठी खेळणी, तलाव, लहानसे ‘बिच’ही उपलब्ध आहे.

नागरिकांना निसर्गाच्या सान्निध्यात फिरता यावे, यासाठी तीन किलोमीटर लांबीचा जॉगिंग ट्रॅक तयार करण्यात आला असून, ५ किलोमीटर व ८ किलोमीटर लांबीचा जॉगिंग ट्रॅक पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. निसर्गाच्या सानिध्यात खुली व्यायामशाळा असून व्यायामाचे साहित्य नागपूर येथून आणण्यात आले आहे. या उद्यानात रानटी डुक्कर, नीलगाय, ससे, सरपटणारे प्राणी, पक्षांच्या विविध जाती, लांडगे आपणांस दर्शन देऊ शकतात. उद्यानात येणाऱ्या नागरिकांसाठी निरीक्षण मनोरे, निसर्ग माहिती केंद्र, पिण्याचे पाणी उपलब्ध आहेत.

वनौषधी, आयुर्वेदासाठी उपयुक्त
वनविभागाच्या ७० हेक्‍टर जागेपैकी सुमारे १० हेक्‍टर जागेवर हे उद्यान बनविण्यात आले. १ जुलै २०१६ ला या उद्यानासाठी पहिले झाड लावले. या उद्यानात सुमारे ३ हजार झाडे लावण्यात आली आहेत. 

सर्वधर्मीय वनाची निर्मिती
सर्वधर्मीय वन अशी नवीन संकल्पना येथे राबविण्यात आलेली असून त्यात रामायण वन, रामायणात उल्लेख असलेल्या अनेक वनस्पती या उद्यानात दिसतील, महाभारत उद्यान, अशोक उद्यान, जैन उद्यान, इस्लाम उद्यान, ख्रिस्ती उद्यान, त्रिफळा उद्यान, बौद्ध उद्यान, गणेश आराधनेत लागणाऱ्या विविध वनस्पतींचे गणेश वन, पंचवटी वन, गुलाब उद्यान, नंदन वन, लाख वन, १२ राशी व २७ नक्षत्रे नुसार विविध राशींसाठी लाभदायक असलेले वृक्ष माहितीसह नक्षत्र उद्यान, अंजीर उद्यान, ताड उद्यान, वेळू (बांबू ) उद्यान निर्माण करण्यात आले आहे. औषधांचे गुणधर्म असलेल्या औषधांची झाडे लावण्यात आली आहे. यात खैर, नीम, अंजन, बोर, बाभूळ, काटेसावर, शेवगा, आपटा, हेंकळ यांसारख्या ७० हून अधिक वनस्पतींची झाडे या उद्यानांमध्ये झाडांची माहिती व त्यांचे औषधी गुणधर्मांची माहिती नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे.

१ कोटी ८० लाखाचा खर्च
उद्यानात ७० हून अधिक वनस्पतींच्या प्रजाती, सरपटणाऱ्या प्राण्यांच्या पंधरापेक्षा अधिक प्रजाती, पक्षांच्या ६८ प्रजाती, बांबू उद्यानात ३५ प्रकारच्या बांबू प्रजाती, अंजीर उद्यानात अंजीर प्रजाती, ताड उद्यानात ३२ ताड प्रजाती. हर्बल उद्यानात मनुष्याच्या प्रकृतीस आवश्‍यक अशा १०८ प्रकारच्या वनस्पती आहेत. वनविभागाने येथे गेल्या पाच ते सहा वर्षात जाणीवपूर्वक प्रयत्न करून हिरवा पट्टा विकसित केला आहे. लांडोरखोरी उद्यान उभारणीसाठी जवळपास १ कोटी ८० लाखांचा खर्च करण्यात आला आहे. उद्यानाच्या देखभालीसाठी येणाऱ्या नागरिकांकडून वीस रुपये शुल्क आकारण्यात येत आहे. मासिक, वार्षिक शुल्क एकावेळी भरल्यास सवलत देण्यात येत आहे.