आधुनिक फर्निचरसह गृहसजावटीचा ‘ट्रेंड’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 जून 2017

कलात्मकतेकडे ओढा; आरामदायी खुर्च्यांना विशेष मागणी

जळगाव - अलीकडे घराचे लावण्य खुलविणारे फर्निचर दैनंदिन गरजेचे बनले असून इर्म्पोटेड फर्निचरबरोबरच केन (बाँस) पासून तयार केलेले फर्निचर घराची शोभा वाढवत आहे. घरामध्ये पिढ्यान्‌पिढ्या असलेल्या फर्निचरला फाटा देऊन अत्याधुनिक आणि कलाकुसर असणाऱ्या फर्निचरच्या माध्यमातून घराचा ‘लूक’ बदलण्याचा ‘ट्रेंड’ रुजला आहे. विशेष म्हणजे खुर्च्यांच्या बाबतीतही मोठे बदल झाले असून घर असो वा ऑफिस आरामदायी खुर्च्यांनाच जास्त पसंती दिली जात आहे.

फर्निचर घराच्या एकूण जागेनुरूप आणि उपलब्धतेनुरूप बदलविले जाते. काळ बदलत गेला तशी जीवनशैली बदलत गेली. त्यानुसार गरजा वाढत गेल्या आणि घरामध्ये फर्निचरची गरज जाणवू लागली. फर्निचर ही सुरवातीला जरी गरज असली, तरी हळूहळू यात कलात्मकतेचा समावेश होत गेला आणि त्याला आज सजावटीचे स्वरूप प्राप्त झाले. त्यानुसारच पूर्वी खुर्ची म्हटले की जाड पत्रा आणि फोल्डिंगची किंवा सागवानी लाकडाची असायची. कार्यालयांमध्ये लाकडी खुर्च्यांचा वापर सर्रास केला जात असे. परंतु अशा खुर्चीत सलग काही तास बसणे पाठ आणि आरोग्याच्या दृष्टीने त्रासदायक ठरू लागले. ही बाब लक्षात घेऊन अनेक कंपन्यांनी आरामदायक खुर्च्या तयार केल्या. 

आधुनिक आरामदायक खुर्च्यांच्या किमती साधारण तीन ते नऊ हजार रुपयांपर्यंत आहे. किंमत जास्त असली तरी आरामदायक वाटणाऱ्या या खुर्च्या आज प्रत्येक कार्यालयांमधील वरिष्ठांसाठी आहेत. त्यामध्ये बसणाऱ्याला अधिकाधिक आराम कसा मिळेल, याचा प्रामुख्याने विचार करण्यात आला आहे. 

सोफा, दिवाणची मागणी 
फर्निचर विकत घेताना साधारणतः किचन, बेडरूम आणि बैठक खोलीसाठी लागणारे फर्निचर असे प्रकार येतात. सर्वप्रथम घरात पाऊल टाकल्याबरोबर असलेली बैठकीच्या खोलीत येणाऱ्या चांगले वाटेल; त्यानुसार ही खोली जास्तीत जास्त सुखकारक करण्यावर भर असतो. यासाठी सोफासेट, टी-पॉय, शो-केस, टीव्ही, म्युझिक प्लेयर तसेच बऱ्याचदा दिवाण, इझी चेअर यासारखे फर्निचर घेतले जाते.

प्लास्टिकपासून अगदी लेदरच्या आरामदायी खुर्च्यांमध्ये विविध प्रकार उपलब्ध आहेत. ग्राहकांच्या मागणीनुसार आरामदायी खुर्च्यांची निर्मिती केली जाते.

- राजेंद्र गांधी, संचालक, गांधी ट्रेडर्स.