एकाच क्रमांकाच्या दोन कार!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 जुलै 2017

चोरीची असल्याचा संशय; चालकांमधील वादाने गोंधळ
जळगाव - येथील पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर दोन कारचा क्रमांक सारखाच असल्याचे आढळून आल्‍यानंतर विचारणा केली असता, दोन्ही चालकांमध्ये वाद होऊन गोंधळ उडाला.

चोरीची असल्याचा संशय; चालकांमधील वादाने गोंधळ
जळगाव - येथील पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर दोन कारचा क्रमांक सारखाच असल्याचे आढळून आल्‍यानंतर विचारणा केली असता, दोन्ही चालकांमध्ये वाद होऊन गोंधळ उडाला.

महाबळ येथील रहिवासी संदीप याज्ञिक दुपारी घराकडे येत असताना, पोलिस अधीक्षक कार्यालयासमोरच, उभ्या होंडा अमेझ पांढऱ्या रंगाची कार (एमएच १९, बीयू ५५३५) रस्त्याच्या कडेला उभी होती. क्रमांक सारखा असल्याचे पाहून याज्ञिक गोंधळात पडले. त्यांनी तत्काळ घरी मुलाला दूरध्वनीवरून संपर्क करून ते वापरत असलेल्या महिंद्रा व्हॅटिगो कारची (एमएच १९, बीयू ५५३५) माहिती मागवली. मुलाने लगेच कागदपत्रांवरून क्रमांक आणि नोंदणीची माहिती दिली. तोपर्यंत याज्ञिक यांनी त्या संशयित कारबाबत विचारणा केली असता, होंडा सिटी कार घेऊन आलेले गृहस्थ समोरच भजे गल्लीत गेल्याचे समजले. वाहतूक पोलिसांना हा प्रकार सांगण्यात आला.

वाहतूक पोलिसांनीही संबंधित कारचालकास बोलावण्याचा प्रयत्न केला. तासाभरात कार्यक्रम आटोपून संबंधित कारचालक बाहेर आला. कारजवळ आल्यावर विचारपूस केली. त्यांनी याज्ञिक यांच्याशी वाद घातल्याने प्रकरण हमरीतुमरीवर गेले. उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे यांनी दोन्ही कार जिल्हापेठ पोलिस ठाण्यात पाठवून चौकशी करण्याच्या सूचना दिल्या. याज्ञिक यांनी वाहनाची कागदपत्रे दाखवून ते घरी नेले.

होंडा अमेझ कारचालक नरेंद्र विठ्ठल वारके (रा. रिंग रोड) यांच्याकडून जिल्हापेठ पोलिसांनी कार ताब्यात घेत कागदपत्रे आणण्यास सांगितले. मात्र, कागदपत्रे आता नसल्याचे म्हणत कार आपण गोवा येथून फायनान्स कंपनीकडून आणल्याचे त्याने सांगितले. वारके बोलण्याच्या स्थितीत नसल्याने याप्रकरणी उद्या (२७ जुलै) सकाळपर्यंत चौकशी केल्यानंतर गुन्हा दाखल होईल.

टॅग्स