जो दहशतवादी असेल तो मुस्लिमच नाही - मलिक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑगस्ट 2017

जळगाव - भारतातील मुस्लिम बांधव देशाशी एकनिष्ठ आहेत. देशासाठी तो स्वतःचा जीवही देऊ शकतो. जो देशासाठी जीव देऊ शकतो, तो कधीच दहशतवादी असू शकत नाही. जो दहशतवादी तो मुस्लिम असूच शकत नाही, असे मत अंजुमन तालिमूल मुस्लेमिन संस्थेचे अध्यक्ष गफ्फार मलिक यांनी व्यक्त केले. 

जळगाव - भारतातील मुस्लिम बांधव देशाशी एकनिष्ठ आहेत. देशासाठी तो स्वतःचा जीवही देऊ शकतो. जो देशासाठी जीव देऊ शकतो, तो कधीच दहशतवादी असू शकत नाही. जो दहशतवादी तो मुस्लिम असूच शकत नाही, असे मत अंजुमन तालिमूल मुस्लेमिन संस्थेचे अध्यक्ष गफ्फार मलिक यांनी व्यक्त केले. 

दहशतवादी हल्ल्यातून नागरिकांना वाचविणारे वाहनचालक सलीम शेख यांच्या सत्काराप्रसंगी ते बोलत होते. अंजुमन तालिमूल संस्थेतर्फे अँग्लो उर्दू हायस्कूलच्या मैदानावर या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. व्यासपीठावर माजी खासदार ईश्‍वरलाल जैन, आमदार सुरेश भोळे, माजी मत्री गुलाबराव देवकर, कैलास सोनवणे, सचिन नारळे, भगत बालाणी आदी उपस्थित होते. यावेळी मोहम्मद सलीम शेख यांचा गुलाबपुष्प व शाल देऊन सत्कार करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष- माजी नगरसेवक गफ्फार मलिक प्रास्ताविकात म्हणाले, की अमर शहीद अब्दुल हमीद असो की मोहम्मद सलीम असो भारताचा मुसलमान देशाशी एकनिष्ठ आहे. 

श्री. जैन म्हणाले, की ज्या पद्धतीने एका समईचा दिवा दुसऱ्याला प्रज्वलित करतो त्याप्रमाणे भारतात विविधतेत एकता दिसते. भारतात हिंदू- मुस्लिम दिव्याप्रमाणे आहेत. श्री. भोळे म्हणाले, की मोहम्मद सलीम खान याने साहस दाखवून लोकांचे प्राण वाचविले. त्यामुळे आपल्या खानदेशचा मान उंचावला आहे. श्री. देवकर म्हणाले, की सलीम खान यांचे साहस मोठे आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसतर्फेही लवकरच त्यांचा सत्कार करण्यात येईल. 

गनी मेमन म्हणाले, की जो कुराण वाचेल तो दहशतवादी होऊ शकत नाही. सलीम खान यांनी दाखविलेले धाडस कौतुकास्पद आहे. यावेळी सत्कारार्थी सलीम खान यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी महापालिकेतील राष्ट्रवादीचे गटनेते सुरेश सोनवणे, ‘इकरा’चे अध्यक्ष करीम सालार, उद्योजक युसूफ मकरा, बांधकाम व्यवसायिक श्रीराम खटोड, पिंच सोडाचे जफर शेख, ॲड. शरीफ शेख आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात कुराण पठणाने करण्यात आली. शाळेतील विद्यार्थिनी खदीजा इकबाल हिने ‘ऐ मेरे वतन के लोगो’ हे देशभक्तिपर गीत सादर केले. डॉ. अफक शेख यांनी सूत्रसंचालन केले.

उत्तर महाराष्ट्र

नाशिक - पश्‍चिम पट्ट्यातील तालुक्‍यात मंगळवारी (ता.19) सायंकाळपासून पुन्हा दमदार पाऊस सुरू झाला आहे. रात्रीच्या मुसळधार पावसानंतर...

01.39 AM

वणी (नाशिक): सप्तश्रृंगी गडावर नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेस आदिमायेचे दर्शनासाठी येणाऱ्या केळी रुम्हणवाडी (ता. अकोले) येथील...

बुधवार, 20 सप्टेंबर 2017

वणी (नाशिक) :  महाराष्ट्राचे आराध्य दैवत सप्तशृंग मातेच्या नवरात्रोत्सवास उद्या (गुरुवार) पासून उत्साहात सुरुवात होत असून,...

बुधवार, 20 सप्टेंबर 2017