''नोटाबंदीमुळे शहर बेहाल''

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 जानेवारी 2017

मालेगाव : नोटाबंदीमुळे शहरातील अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे. पंतप्रधानांनी 50 दिवसांत सर्व अडचणी दूर होतील. व्यवहार, कामकाज सुरळीत होऊन बॅंकेत पैसे उपलब्ध होतील, असे आश्‍वासन दिले होते. मात्र, हा निर्णय अयशस्वी ठरला असून, यासह केंद्र शासनाच्या विविध आश्‍वासनांमुळे जनतेची फसवणूक झाली आहे. पंतप्रधानांनी नागरिकांच्या समस्यांचे उत्तर द्यावे; अन्यथा तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जनता दलाने केली आहे. 

जनता दलाचे शहराध्यक्ष बुलंद एकबाल, सचिव मुश्‍तकीम डिग्निटी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तहसीलदार डॉ. सुरेश कोळी यांना निवेदन दिले. निवेदनात नोटाबंदीचा निर्णय अयशस्वी ठरल्याची टीका करण्यात आली आहे. येथील सर्व व्यवसाय व कामकाज ठप्प झाले आहेत. रांगेत एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. नोटाबंदीमुळे निर्माण झालेली बेरोजगारी व कौटुंबिक कारणामुळे यंत्रमाग कामगाराने आत्महत्या केली. या दोघा नागरिकांच्या कुटुंबीयांना केंद्राने आर्थिक मदत द्यावी. पंतप्रधानांनी शहरवासीयांच्या प्रश्‍नांना उत्तर देण्यासाठी 6 जानेवारीला शहरात यावे. पक्षाचे पदाधिकारी व नागरिक भिक्कू चौकात दुपारी तीनपर्यंत आपली प्रतीक्षा करतील, असे साकडे पंतप्रधानांना घालण्यात आले आहे. निवेदनाच्या प्रती पंतप्रधान नरेंद्र मोदी, प्रांताधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांना पाठविण्यात आल्या आहेत.

उत्तर महाराष्ट्र

निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे): जैताणे(ता.साक्री) येथील धनगर समाजाचे कार्यकर्ते तुकाराम नका ठाकरे हे गेल्या 30 वर्षांपासून...

मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

निजामपूर (धुळे): येथील जवाहरलाल वाचनालयातर्फे नुकतीच आठवी ते दहावी व अकरावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी दोन गटात शिष्यवृत्ती...

मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

चार दिवसांवर उत्सव; मूर्तिकार, मंडळांचीही लगबग वाढली जळगाव - गणपती बाप्पा मोरया...पुढच्या वर्षी लवकर या...अशी आर्त हाक देत...

मंगळवार, 22 ऑगस्ट 2017