बैलपोळ्याच्या दिवशी सोयगावला पोलिसांची सन्मान योजना

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

जरंडी - दुष्काळी परिस्थितीतही शेतीची कास न सोडणाऱ्या शेतकऱ्यांचा व त्यांना साथ देणाऱ्या सर्जाराजाचा सन्मान करण्याचा अनोखा उपक्रम सोयगाव पोलिसांनी बैलपोळा सणाच्या दिवशी सोमवारी(ता.२१) वेशीबाहेरील पोळा सणात सहभागी शेतकऱ्यांचा शाल,श्रीफळ देवून पोलिसांनी सन्मान केल्याने या उपक्रमाचे शहरभर कौतुक होत आहे.पोलिसांनी बैलपोळा सणाच्या दिवसापासून जिल्ह्यात सोयगावपासून या उपक्रमाची सुरुवात केली आहे.                                                                                        

बैलपोळा शेतकऱ्याचा हा सण सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला.परंतु सोयगावला मात्र पोलिसांनी नवीन प्रथा सुरु करून पोळा सणाच्या उत्सवात सहभागी प्रत्येक शेतकऱ्याचा शेतकरी सन्मान योजनेद्वारे सत्कार करूनशेतकऱ्याचे व त्याच्या सर्जाराजाचे मोठे कौतुक केले.त्यामुळे सोयगावच्या या उपक्रमाचा जिल्हाभर गाजावाजा झाला आहे.या उपक्रमामुळे सोयगावचा पोळा अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला.पोलीस निरीक्षक सुजित बडे,तहसीलदार छाया पवार,आदींसह शासनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सोयगावच्या पोळ्यात शेतकऱ्याचा सन्मान करून दुष्काळाच्या झळा दूर करून त्यावर फुंकर घालण्याचा मोठा प्रयत्न केला आहे.या उपक्रमात राजकीय मंडळीही हिरहिरीने सहभागी झाली होती हे विशेष,स्थानिक राजकीय मंडळींनीही यामध्ये हातभार लावल्याने उपक्रम मोठा झाला होता.यावेळी नगराध्यक्ष कैलास काळे,उपनगराध्यक्ष योगेश पाटील,राष्ट्रवादीचे राजू दुतोंडे,पञकार याेगेश बाेखारे,भिमराव देसाई,आदींनी उपस्थिती दर्शविली होती.पोलीस ठाण्यासमोरील वेशितच हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला.

जरंडीला ही नवीन उपक्रम-
जरंडी ता.सोयगाव येथे पोळा सणाच्या दिवशी तालुक्यात पहिला बैलपोळा फोडण्याचा मान जरंडी गावाला मिळाला आहे,सरपंच समाधान तायडे,माजी संचालक श्रीराम चौधरी,तंटामुक्त अध्यक्ष नारायण चौधरी,पंचायत समिती सदस्य संजीवन सोनवणे,मधुकर पाटील,दिलीप पाटील आदींनी पुढाकार घेवून मानाच्या बैलाची पूजा करून मध्यान्हपूर्वी पोळा फोडण्याचा मान पटकाविला आहे.त्यामुळे जरंडी ग्रामपंचायत बक्षिसाला पात्र ठरली आहे.