जवाहर नवोदयची 24 जूनला चाचणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 मे 2017

जळगाव - केंद्र शासन संचलित जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता 9 वी प्रवेशासाठी निवड चाचणी परीक्षा 24 जूनला जवाहर नवोदय विद्यालयात (साकेगाव, ता. भुसावळ) होणार आहे. या परीक्षेसाठी छापील अर्ज विनामूल्य प्राचार्य, जवाहर नवोदय विद्यालय (साकेगाव) भुसावळ, यांच्या कार्यालयात 12 ते 29 मे पर्यंत उपलब्ध आहेत. संपूर्ण भरलेला अर्ज पालकांनी प्राचार्य, जवाहर नवोदय विद्यालय (साकेगाव) यांच्या कार्यालयात 29 मेस सायंकाळी 5 वाजेपर्यंत जमा करावेत. प्रवेश अर्ज व माहिती पत्रक www.invialgaon.com आणि www.nvshq.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

चाचणी परीक्षेसाठी शैक्षणिक वर्ष 2016-17 मधील इयत्ता 8 वी उत्तीर्ण व जळगाव जिल्ह्यातील शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी पात्र आहेत. इच्छुक पालक व विद्यार्थ्यांनी संधीचा लाभ घ्यावा, असे जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य वे. नारायण राव यांनी कळविले आहे.

टॅग्स