'मेरे पती की हत्या हुई है, मुझे इन्साफ चाहीये!'

jawan
jawan

येवला : मेरे पती की हत्या हुई है,देशसेवा के लिये बीस साल छोडा था, अभी पार्थिव बी छोड दुंगी...मुझे इन्साफ चाहीये-इन्साफ..अनिता दिगंबर शेळके हि महिला हंबरडा फोडून अस्लीखीत हिंदीत टाहो फोडत होती. आपला पती देशसेवेत असल्याचा अभिमान बाळगणारी दिगंबर यांची पत्नी आर्त हाक देऊन न्यायाची मागणी करतांना उपस्थित हजारोंच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या.

मानोरी बुद्रुक येथील सीआरपीएफ मध्ये असलेल्या दिगंबर माधव शेळके या ४३ वर्षीय जवानाच्या गुठ मृत्यूने आख्खा येवला तालुका हळहळला आहे. कारणही तसे आहे. येथील प्रत्येक गावातून १०-२० युवक सैनिक असून देशसेवेसाठी तैनात आहेत. आपल्या मुलांचा अभिमान आहे पण असे काही होत असेल तर नक्कीच चिंताजनक आहे.हाच विचार घरातील तिघे सैनिक असलेल्या देशमाने येथील मंगल जगताप यांनी आज याठिकाणी बोलून दाखवला.

मुळात दिगंबर गोळी झाडून घेत आत्महत्या करूच शकत नाही असा ठाम विश्वास त्याचे मेव्हणे सचिन खटकाळे यांनी पुनःपुन्हा बोलून दाखवला. जो माणूस रोज-दिवसाआड माझ्याशी अर्धा तास फोनवर बोलायचा तो मला इतकी बिकट अवस्था असती तर सांगू शकला नसता का..हा सचिन यांचा सवाल सर्व काही सांगून जात होता.याचमुळे दिगंबर यांची घातपात करत हत्या केलेली आहे असा आरोप करत आज दिवसभर त्यांचे कुटुंबिय, नातेवाईक व ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. एकटया मानोरीनेच नव्हे तर आजूबाजूच्या चार-पाच गावाणी देखील दोन दिवस रस्त्यावर आक्रमक होत या कुटुंबांप्रती दाखवलेली आपुलकी दिगंबर यांच्या देशसेवेची व प्रामाणिक कामाची पावतीच म्हणावी लागेल. आज हजारोचा जमाव या माऊलीने जेव्हा हंबरडा फोडून प्रशांची सरबत्ती केली तेव्हा अवाक झाला.

मनमाड विभागाच्या पोलीस उपअधीक्षक राजसुधा दुपारी एक वाजता येथे पोहोचल्या. शेळके यांच्या पत्नी अनिता यांचे सांत्वन करत समजूत घालण्यासाठी घरात गेल्या तेव्हा अनिता यांनी फोडलेला टाहो मन हेलवानारा होता. मेरे पती की हत्या हुई है,देशसेवा के लिये बिस साल पतिको छोडा था, अभी देशके लिये पार्थिव भी छोडा दूनगी' असे ठणकावले. हे उत्तर एकूण पोलिसही निशब्द झाले मग संतप्त ग्रामस्थांनी दबाव टाकू नका,बाहेर व्हा असा आरडाओरडा केला. शेळके यांच्या पाठीमागे पत्नी अनिता, सहावीत शिकत असलेला हर्षल तर पाचवीत शिकत असलेला  मुलगी प्रांजल आहे.केवळ एक एकराची शेती त्यांना असून पती देश्सेवत असतांना पत्नी मात्र या दोन्ही मुलाचा सांभाळ करून शेतिकामही करत होत्या.विभक्त असल्याने पतीच्या आकस्मिक निधनाने या कुटुंबावर मोठी शोककळा पसरली असून अर्धा आसुश्यात पतीने सोबत सोडल्याने अनिता यांना मोठे आव्हान घेऊन संसाराचा गाडा चालवावा लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com