नाशिकला मंगळवारपासून रोजगार भरती मेळावा 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 मार्च 2017

नाशिक- सुशिक्षित बेरोजगारांसाठी 21 व 22 मार्चला महात्मा फुले कलादालनात रोजगार मेळावा होणार आहे. त्यात विविध 39 उद्योगांतील 666 रिक्त पदांसाठी बेरोजगारांना नियुक्‍त्यांसाठी आमंत्रित केले आहे. सहाय्यक संचालक संपत चाटे यांनी ही माहिती दिली.

उमेदवारांनी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या http://rojgar.mahaswayam.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. किमान पाच प्रतींमध्ये अर्जासह फोटो, आधारकार्ड, सेवायोजना नोंदणीसह मुलाखतीला उपस्थित राहता येणार आहे. महारोजगार नोंदणी केल्यास संकेतस्थळावर 15 अंकी नोंदणी क्रमांक टाकून लॉगीन करता येईल.  अडचण असल्यास 18602330133 या हेल्पलाइनचा उपयोग करता येणार आहे. किमान वय 18 वर्षे पूर्ण असणे गरजेचे असून, इयत्ता दहावी, बारावीसह पदविका, पदवी आणि अभियांत्रिकीसह विविध व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केलेल्यांना सहभागी होता येईल. 

Web Title: job recruitment in nashik

टॅग्स