..आताशी फोटो हटला; अजून हिटलरशाही यायचीय

Radhakrishna Vikhe
Radhakrishna Vikhe

नाशिक : "देशात चुकीचे घडत आहे. आताशी महात्मा गांधी यांचा फोटो हटला आहे. अजून हिटलरशाही यायची आहे," असा आरोप माजी मंत्री मधुकर पिचड यांनी केला. 

विधानपरिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघात मंगळवारी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉग्रेस अन्‌ शिक्षक विकास आघाडीचे (टीडीएफ) उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या निमित्ताने प्रचाराचा शुभारंभ झाला. त्यावेळी झालेल्या मेळाव्यात पिचड बोलत होते. माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, शिर्डी देवस्थानचे माजी अध्यक्ष जयंत ससाने, माजी राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव, आमदार चंद्रकांत रघुवंशी, नरहरी झिरवाळ, जयवंत जाधव, श्‍याम सनेर, श्रीराम शेटे, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड रविंद्र पगार, माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, टी.डी.एफ.चे नेते फिरोज बादशाह, शालीग्राम भिरुड, बल्लाळकर आदी उपस्थित होते.

पिचड म्हणाले, "पदवीधर शिक्षित मतदारच हिटलरशाही रोखू शकतात. कारण या देशात अनेक कमी शिकलेल्या नेत्यांनी चांगली कामे करीत बदल घडविले आहे. निवडणुकीत सगळेच मतदार तर पदवीधर आहेत त्यामुळे ते हुकमशाही रोखतीलच."

'पदवीधर'मधून रोवू विजयाची मूहूर्तमेढ- विखे पाटील

राज्यात 2 वर्षांत शिक्षण व्यवस्थेचा खेळखंडोबा झाला आहे. पदवीधर मतदार 6 फेब्रुवारीच्या निकालात कॉंग्रेस आघाडीला कौल देऊन आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणूक निकालाची मूहूर्तमेढ रोवतील, असा दावा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी येथे केला.

विखे पाटील म्हणाले, "देशात नोटाबंदीनंतर 15 दिवसांत 63 वेळा दुरुस्तीच्या वेळ सरकारवर आली. सामान्य नागरिकांचे त्यामुळे प्रचंड हाल झाले. राज्यात शिक्षण व्यवस्थेला योग्य दिशा देण्यासाठी डॉ. सुधीर तांबे यांच्यासारख्या व्यक्तीची गरज आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने येत्या 6 तारखेला मतदार विजयाच्या रुपाने त्यांना भेट देतील."

'रेकॉर्डब्रेक' मते घेऊ 
थोरात म्हणाले की, "इतरांप्रमाणे महापालिका, जिल्हा परिषद इच्छुकाला चारशे, तर आमदारांनी एक हजार लोक आणावेत असा कुठलाही कोटा कॉंग्रेस आघाडीतर्फे ठरवून देण्यात आलेला नव्हता. तरीही डॉ. तांबे यांच्या प्रेमापोटी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उस्फूर्त आणि स्वयंस्फुर्तीने गर्दी झाली. ही गर्दी हेच त्यांच्या यशाचे गमक आहे. पदवीधर मतदारसंघाची आमदारकी मेहनतीची आहे. डॉ. तांबे यांनी त्यांच्या कामातून आदर्श लोकप्रतिनिधीचे उदाहरण निर्माण केले आहे.
टीडीएफचे राज्याध्यक्ष बल्लाळकर, आमदार रघुवंशी, आमदार जाधव, एन. एम. आव्हाड, अॅड. पगार, पानगव्हाणे आदींची भाषणे झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com