काळाराम मंदिरातही आता लेसर शो

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 ऑगस्ट 2016

नाशिक - येथील प्रसिद्ध काळाराम मंदिर परिसराचे सुशोभीकरण केले जाणार आहे. सुशोभीकरणात मंदिरातील ओवऱ्यांमध्ये रामायणातील चित्रमय प्रसंग, दक्षिण दरवाजाच्या बाजूला लेसर शो, मंदिरात 24 तास विजेसाठी जनरेटर आदी कामांचा समावेश असणार आहे. यासाठी पर्यटन विकासअंतर्गत पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
 
काळाराम मंदिर पेशवेकाळात 1792 मध्ये बांधण्यात आले. मंदिर भव्य स्वरूपात असून, त्याच्याभोवती असलेला कोट व ओवऱ्यांमुळे मंदिर अधिक आकर्षक झाले आहे. नाशिकमध्ये रामकुंडावर आलेला पर्यटक मंदिरात दर्शनासाठी हमखास जातोच. मात्र, मंदिर परिसरात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी लेसर शो व रामायणकाळातील प्रसंगांचे चित्र उभारणे आदी गोष्टी संस्थानच्या विश्‍वस्तांच्या मनात अनेक वर्षांपासून होत्या. विश्‍वस्तांनी काळाराम मंदिर परिसराच्या सुशोभीकरणाची कल्पना आमदार बाळासाहेब सानप यांच्याकडे मांडली. आमदार सानप यांनी पर्यटन राज्यमंत्री राम शिंदे यांच्याकडे त्यासाठी निधीची मागणी केली. त्यानुसार पर्यटन विभागाने संस्थानच्या मागणीनुसार काळाराम मंदिराच्या सुशोभीकरणासाठी पाच कोटींचा निधी मंजूर केला आहे. 

Web Title: Kalarama house now laser show