राज्यात कळवण ठरला पहिला स्वच्छ 'पेसा' तालुका

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

आठपैकी चार पालिकांसह 520 गावे स्वच्छ
नाशिक - स्वच्छ भारत अभियानांतर्गत राज्यातील "पेसा'त समावेश होणाऱ्या तालुक्‍यात स्वच्छ तालुका म्हणून लौकिक मिळविण्यात कळवण तालुका राज्यात पहिला ठरला आहे. नाशिक जिल्ह्यातील एक हजार 382 पैकी 520 गावे स्वच्छ झाली आहेत.

आठपैकी चार पालिकांसह 520 गावे स्वच्छ
नाशिक - स्वच्छ भारत अभियानांतर्गत राज्यातील "पेसा'त समावेश होणाऱ्या तालुक्‍यात स्वच्छ तालुका म्हणून लौकिक मिळविण्यात कळवण तालुका राज्यात पहिला ठरला आहे. नाशिक जिल्ह्यातील एक हजार 382 पैकी 520 गावे स्वच्छ झाली आहेत.

देशात स्वच्छ भारत अभियानात राज्य आघाडीवर आहे. त्यात कोकण विभागाची आघाडी असली, तरी नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर स्वच्छ शहर व गावांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यात एक हजार 382 ग्रामपंचायती असून, 520 गावे स्वच्छ झाली आहेत. नजीकच्या काळात ही संख्या 760च्या जवळ पोचेल अशी स्थिती आहे. जिल्ह्यात स्वच्छ पालिकांची संख्या वाढत आहे. आठपैकी चार पालिकांनी स्वच्छ पालिका म्हणून दावा केला आहे. पन्नास टक्‍क्‍यांवर पालिका स्वच्छ झाल्या आहेत.

कळवणची आघाडी
"पेसा'त समावेश होणाऱ्या आदिवासी तालुक्‍यांत कळवण असा तालुका आहे, की ज्यातील गाव पहिल्यांदा राज्यात पहिले स्वच्छ गाव झाले. कोल्हापूर महापालिका पहिली स्वच्छ महापालिका ठरली. आता नाशिक महापालिकेची त्या दिशेने वाटचाल सुरू आहे. सहा हजार 300 लाभार्थ्यांना शौचालय उभारण्याचे उद्दिष्ट हाती घेतलेल्या नाशिक महापालिकेने सहा हजारांहून अधिक शौचालयांची उभारणी सुरू केली आहे. जिल्हा परिषदेतर्फे ग्रामीण भागात मोहिमा सुरू आहेत. त्यात 260 गावांत स्वच्छ होण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत.

उत्तर महाराष्ट्र

रुग्णवाहिका नाकारली; मृतदेह तहसीलसमोर नांदगाव - सततची नापिकी आणि व कर्जबाजारीपणाला कंटाळून तालुक्‍यातील चांदोरा येथील नामदेव...

01.27 PM

के. सी. पांडे - गारगोटी ‘ग्लोरी’; हिऱ्यापेक्षा अधिक भावाने विकण्याची क्षमता नाशिक - आपण गरिबीची चर्चा अधिक करतो, पण...

01.27 PM

निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : जैताणे (ता.साक्री) येथील विकी जिभाऊ जाधव (वय 18) व अशोक (पिंटू) आनंदा पगारे (वय 27) या माळी व...

01.24 PM