काश्‍मीरमध्ये अशांततेचे रंगविलेले चित्र चुकीचेच

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 जून 2017

जळगाव - काश्‍मीरमध्ये अशांतता आहे, रस्त्यावर ठिकठिकाणी लष्कराचे जवान आहेत, दगडफेक सुरू आहे, असे चित्र टीव्हीवर दिसते. मात्र प्रत्यक्षात त्या ठिकाणी परिस्थिती वेगळी आहे. केवळ काही भागांतच अशा घटना घडत आहेत. काश्‍मीरचा बहुतांश भाग अत्यंत शांत आहे. कोणीही कोणतेही संरक्षण न घेता त्या ठिकाणी सहज पर्यटनास जाऊ शकतो, अशी माहिती संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.

डॉ. भामरे म्हणाले, ""पाकिस्तान सरळ युद्धात भारताशी कधीही जिंकू शकत नाही. त्यामुळे ते "छुपे युद्ध' छेडत आहेत. सीमेवर दहशतवादी कारवाया करणे, हा पाकिस्तानचा अजेंडाच झाला आहे. तरुणांना दगडफेक करण्यास प्रवृत्त करून त्यांना त्या बदल्यात पैसे देणे, हा त्यांचा व्यवसाय झाला आहे. नोटाबंदीच्या काळात पैसे नसल्याने दगडफेक बंद झाली होती, आता ती पुन्हा सुरू झाली आहे. तथापि, काश्‍मीरमधील काही भागांतच ही स्थिती आहे. काश्‍मीरचा बहुतांश भाग शांत आहे. त्यामुळे टीव्हीवर दिसत असलेले सर्वत्र अशांततेचे चित्र अवास्तव आहे.''

केंद्र सरकारच्या तीन वर्षांच्या कार्यकाळाबाबत डॉ. भामरे म्हणाले, ""मोदी सरकारने तीन वर्षांत विकासाचा अजेंडा राबविला आहे. देशात सर्वच क्षेत्रांत विकास होतो आहे. अन्नसुरक्षा, सर्वांना गॅस अशा विविध योजना सर्वसामान्य माणसापर्यंत पोचल्या आहेत.''