कॅन्सरशी झुंज देत टाहकळीच्या कौशलची "एक्‍झिट' 

प्रवीण पाटील - सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 3 मार्च 2017

सावदा - कुटुंबाचा एकुलता मुलगा, सुस्वभावी, घरची परिस्थिती जेमतेम, खूप शिकण्याची इच्छाशक्ती, शिकून खूप मोठे व्हावे, आपले व आईृवडिलांचे नाव मोठे करावे, असे स्वप्न उराशी बाळगलेले. बारावीची परीक्षा तोंडावर. पण रक्ताच्या कर्करोगाने (ब्लड कॅन्सर) अखेर घात केलाच. ही दुःखद घटना आहे हतनूर धरणाजवळील टाहकळी (ता. भुसावळ) येथील. येथील श्री. आ. गं. हायस्कूलचा बारावीचा विद्यार्थी कौशल पंडित पाटील (वय 18) याचा रक्ताच्या कर्करोगामुळे आज मृत्यू ओढवला. एकुलता मुलगा गमावल्याने पाटील परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

कौशल बारावीत शिकत होता. त्याला काही दिवसांपूर्वी रक्ताच्या कर्करोगाने ग्रासले. कुटुंबीयांनी शक्‍य तेवढे औषधोपचार करून पाहिले, पण उपयोग झाला नाही. तरीही त्याची शाळेत जाण्यासाठी धडपड, पण काय करणार आजारामुळे तो थकल्याने शाळेत जाऊ शकत नव्हता. त्याची बारावीची परीक्षाही नुकतीच सुरू झाली. 28 फेब्रुवारीला त्याचा इंग्रजीचा पहिला पेपर होता. पण प्रकृती खालावल्याने परीक्षेला जाता येणार नाही, असा सल्ला डॉक्‍टरांनी दिला. आपले सर्व मित्र तिकडे परीक्षा देत आहे व आपण मात्र पेपर देऊ शकत नाही, याचे कौशलला शल्य बोचत होते. तो अंथरुणावरच सारखा रडला. अखेर त्यास आज सकाळी मृत्यूने गाठले. या घटनेने समाजात हळहळ व्यक्‍त होत आहे. 

कौशलची घरची आर्थिक स्थिती जेमतेम, सुस्वभावी व मनमिळावू, शिकण्याची त्याची दुर्दम्य इच्छाशक्‍ती पाहून शाळेचे प्राचार्य सी. सी. सपकाळे, चित्रकला शिक्षक नंदकिशोर पाटील, संजय महाजन आदींनी त्यास शिक्षणासाठी अनेकवेळा प्रोत्साहन, सहकार्य व धीर दिला. पण अखेर रक्ताच्या कर्करोगाने कौशलला गाठलेच. तेथे शिक्षक व कुटुंबीय तरी काय करणार. आज येथील श्री. आ. गं. हायस्कूलच्या बारावी परीक्षा केंद्रात सकाळी अकराला पेपर सुरू होण्याच्या पंधरा मिनिटे आधी सर्व परीक्षार्थी व शिक्षकांनी दोन मिनिटे उभे राहून शांतीमंत्राचे पठण करून कौशलला श्रद्धांजली अर्पण केली व पेपर दिला. यावेळी कौशलच्या मृत्यूच्या वृत्ताने सर्वांचे डोळे पाणावले. कौशलमागे आई, वडील, बहीण असा परिवार आहे. 

Web Title: kaushal patil dead