धुळ्यात आज ‘खानदेश क्‍वीन’ स्पर्धा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 मार्च 2017

अभिनेत्री अलका कुबल, उद्योजिका उज्ज्वला हावरेंची उपस्थिती
धुळे - जागतिक महिला दिनानिमित्त येथील महापालिका व अनन्या ग्रुपतर्फे उद्या (ता. १८) दुपारी चारला येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज नाट्यमंदिरात ‘खानदेश क्वीन’ स्पर्धा होईल. अभिनेत्री अलका कुबल व उद्योजिका उज्ज्वला हावरे यांची प्रमुख उपस्थिती असेल.

अभिनेत्री अलका कुबल, उद्योजिका उज्ज्वला हावरेंची उपस्थिती
धुळे - जागतिक महिला दिनानिमित्त येथील महापालिका व अनन्या ग्रुपतर्फे उद्या (ता. १८) दुपारी चारला येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज नाट्यमंदिरात ‘खानदेश क्वीन’ स्पर्धा होईल. अभिनेत्री अलका कुबल व उद्योजिका उज्ज्वला हावरे यांची प्रमुख उपस्थिती असेल.

खानदेशातील युवती व भगिनींच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, सौंदर्य स्पर्धेविषयी माहिती व्हावी व त्यातून प्रेरणा मिळावी, यासाठी ‘खानदेश क्वीन’ स्पर्धा होत आहे. महापौर कल्पना महाले, आयुक्त संगीता धायगुडे, अनन्या ग्रुपच्या रेखा मुंदडा यांनी स्पर्धेसाठी पुढाकार घेतला आहे. 

माजी आमदार राजवर्धन कदमबांडे व मीनाक्षी कदमबांडे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्‌घाटन होईल. जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, जिल्हा पोलिस अधीक्षक चैतन्य एस., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख यांच्या हस्ते दीपप्रज्वलन होईल. अप्पर तहसीलदार ज्योती देवरे, उपमहापौर उमेर अन्सारी, स्थायी समितीचे सभापती कैलास चौधरी, सभागृह नेते अर्शद पठाण, महापालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती इंदूबाई वाघ, उपसभापती चंद्रकला जाधव, विरोधी पक्षनेते गंगाधर माळी, मनपा शिक्षण मंडळाचे सभापती संदीप महाले, उपायुक्त रवींद्र जाधव, आशा छाजेड आदी उपस्थित असतील. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमही होईल.

स्पर्धेच्या यशस्वितेसाठी कोरिओग्राफर गुळवे, स्पर्धाप्रमुख शीतल शहा, सुषमा अग्रवाल परिश्रम घेत आहेत. कार्यक्रम विनामूल्य असून महिला, युवतींनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन महापौर महाले, आयुक्त धायगुडे व अनन्या ग्रुपच्या मुंदडा यांनी केले.

स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय येणाऱ्या स्पर्धकांना अनुक्रमे सात हजार, पाच हजार व तीन हजार रुपये आणि सन्मानचिन्ह प्रदान केले जाईल. शिवाय ‘बेस्ट स्माइल’, ‘बेस्ट हेअरस्टाइल’ व ‘बेस्ट पर्सनॅलिटी’साठी स्वतंत्र बक्षिसे दिली जातील. प्रश्‍नफेरीत प्रेक्षकांनाही बक्षिसे मिळतील.

- कल्पना महाले, महापौर, धुळे

Web Title: khandesh queen competition