खवा व्यवसायातून शेतकऱ्याने साधली प्रगती 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 एप्रिल 2018

खामगाव : शेती परवडत नाही, असे रडगाणे गात न बसता शेतीला खवा निर्मितीचा जोडधंदा भेंडवळ येथील शेतकरी सारंगधर वाघ यांनी सुरू केला. खवा विक्रीच्या व्यवसायातून या शेतकऱ्याने प्रगती साधली. हा शेतकऱ्यांसमोर एक आदर्श आहे. 

खामगाव : शेती परवडत नाही, असे रडगाणे गात न बसता शेतीला खवा निर्मितीचा जोडधंदा भेंडवळ येथील शेतकरी सारंगधर वाघ यांनी सुरू केला. खवा विक्रीच्या व्यवसायातून या शेतकऱ्याने प्रगती साधली. हा शेतकऱ्यांसमोर एक आदर्श आहे. 

जळगाव जामोद तालुक्‍यातील भेंडवळ हे गाव तसे घटमांडणीसाठी प्रसिध्द आहे. या गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. मात्र गेल्या काही वर्षात अपुऱ्या पाऊसमानामुळे शेती पिकत नाही. असे असले तरी खचून न जाता येथील सारंगधर वाघ यांनी शेतीला जोडधंदा म्हणून खवा निर्मिती व विक्रीचा व्यवसाय सुरू केला. या व्यवसायात त्यांनी जवळपास चार ते पाच लाख रूपयांची गुतवणूक केली. त्यांचा आता या व्यवसायात चांगलाच जम बसला आहे. प्रत्येक शेतकऱ्याने जोडधंदा करावा, असे सारंगधर वाघ सांगतात. खवा व्यवसाय शक्‍य नसेल तर म्हशी घ्याव्यात. चांगल्या प्रतिचे दूध ४० रूपये लिटर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी दुधाचा व्यवयाय केल्यास त्याला चांगले उत्पन्न मिळेत सोबतच शेतीसाठी शेणखत तयार होईल व रासायनीक खतांचा वापर कमी होवून जमीनीची सुपिकता वाढेल, असेही ते म्हणाले. 

सात वर्षापासून खवा उद्योग 
सुरूवातीस सारंगधर वाघ यांनी दुध विक्रीचा व्यवसाय केला. नंतर त्यांनी खवा उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला. वाघ कुटुंबातील सर्वच सदस्य खवा निर्मितीसाठी मेहनत करतात. शेती सांभाळून हा उद्योग ते करतात. सात वर्षापासून वाघ कुटुंब हा व्यवसाय करत आहेत. 

दररोज दिड क्‍विंटल खवा 
सारंगधर वाघ हे परिसरातील शेतकऱ्यांकडून दररोज ८०० लिटर दुध खरेदी करतात. त्यापासून एक क्‍विंटल ६० किलो खवा तयार होतो. हा खवा ते नांदुरा येथील व्यापाऱ्यांना विकतात. या व्यवसायातून दरमहा २५ ते ३० हजार रूपये नफा मिळतो, असे त्यांनी सांगीतले. 

Web Title: khava business makes development of farmer