नंदुरबारमध्ये मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न फसला 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 मे 2018

नंदुरबार - येथील रेल्वे स्थानकातून तीन वर्षीय मुलाचे अपहरण करण्याचा प्रयत्न आज प्रवाशांच्या सतर्कतेने अयशस्वी झाला. यात अपहरणकर्त्यास रेल्वे पोलिस पथकाने पकडले असून, याबाबत रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथील जुनी सिंधी कॉलनी परिसरातील कमलेश नानकानी, त्यांचे मोठे भाऊ गिरीश श्रीचंदलाल नानकानी व त्यांचा तीन वर्षीय मुलगा आदित्य, हे बहीण पिंकी मनीषकुमार मोहनानी व मेहुणे मनीषकुमार मोहनानी यांना पोचविण्यासाठी रेल्वे स्थानकावर आले होते. प्लॅटफॉर्म दोनवर हे सर्व जण आज सकाळी आले. त्यानंतर साडेअकराच्या दरम्यान प्लॅटफॉर्मवर गाडी आली.

नंदुरबार - येथील रेल्वे स्थानकातून तीन वर्षीय मुलाचे अपहरण करण्याचा प्रयत्न आज प्रवाशांच्या सतर्कतेने अयशस्वी झाला. यात अपहरणकर्त्यास रेल्वे पोलिस पथकाने पकडले असून, याबाबत रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथील जुनी सिंधी कॉलनी परिसरातील कमलेश नानकानी, त्यांचे मोठे भाऊ गिरीश श्रीचंदलाल नानकानी व त्यांचा तीन वर्षीय मुलगा आदित्य, हे बहीण पिंकी मनीषकुमार मोहनानी व मेहुणे मनीषकुमार मोहनानी यांना पोचविण्यासाठी रेल्वे स्थानकावर आले होते. प्लॅटफॉर्म दोनवर हे सर्व जण आज सकाळी आले. त्यानंतर साडेअकराच्या दरम्यान प्लॅटफॉर्मवर गाडी आली. त्यानंतर हे सर्व कुटुंबीय रेल्वेत बहिणीचे सामान चढवीत असताना उदयकुमार छोटेलाल दास (वय 30, रा. ग्राम नदियाकी, ता. काको, जि. जेहानाबाद, बिहार) याने आदित्यला उचलले व तेथून तो पळू लागला. तितक्‍यात कुटुंबीयांचे लक्ष गेल्याने त्यांनी आरडाओरड केली. 

 

Web Title: kidnapping of the child in Nandurbar was unsuccessful