कर्जमाफीसाठी चावडी वाचन नको...

सुनील पाटील
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

कोल्हापूर : कर्जमाफीसाठी केले जाणारे चावडी वाचन म्हणजे शेतकऱयांची जाहिर मानहानी केल्याचा प्रकार आहे. त्यामुळे शासनाने चावडी वाचन रद्द करावे. तसेच अनेक वर्षापासून न दिलेला संस्थाना 4 टक्के लाभांश वाटप करण्याचा महत्वपूर्ण ठराव कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 79 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आज (सोमवार) करण्यात आला. येथील शाहु सांस्कृतिक सभागृहात ही सभा सुरु आहे.

बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, 'नोटबंदीचा सर्वाधिक फटका राज्यातील जिल्हा बँकांना बसला आहे. कोल्हापूर जिल्हा बँकेत 500 आणि 1000 रुपयांच्या 279 कोटींच्या नोटा पडून होत्या. याचा बँकेला फटका बसला. यावर्षी बँकेला 12 कोटी 46 लाख रूपये निवळ फायदा झाला आहे. याच सभासदाना नक्की फायदा होईल.'