कुंचल्यातून विद्यार्थी घडविणारा कलाप्रेमी! 

कुंचल्यातून विद्यार्थी घडविणारा कलाप्रेमी! 

कुंचल्यातून विद्यार्थी घडविणारा कलाप्रेमी! 

जळगाव, ः चित्रकलेची लहानपणापासून प्रचंड आवड, त्यातून कठोर मेहनत घेऊन ही कला आत्मसात 
करणे, त्यानंतर ही कला पुढच्या पिढीमध्ये रुजविण्यासाठी व त्यांचे करिअर घडविण्यासाठी दिवसरात्र झटणारे, जळगावचे चित्रकला शिक्षक म्हणून तरुण भाटे यांची ओळख आहे. गेल्या 25 वर्षांपासून दहा हजार विद्यार्थ्यांना त्यांनी कुंचल्यातून घडविले आहे. 
शहरात 1993 ला चित्रकलेच्या क्‍लासची सुरवात तरुण भाटे यांनी सुरवात करून पाया रोवला. त्यांनी स्वःता चित्रकलेचे विविध माध्यमाचे शिक्षण घेऊन चित्रकला क्षेत्रात एक वेगळे त्यांनी स्थान निर्माण केले. तसेच मराठी सिनेमा अभिनेते चंद्रकांत मांढरे यांच्याकडे कोल्हापूरला जाऊन चित्रकलेतील "पावडर शेडींग' हा कलाप्रकार आत्मसात करून 2000 पासून शहरातील विद्यार्थ्यांना चित्रकला, पावॅडर शेडिंग, वारली आदी चित्रकलेच्या माध्यमातून हे आजही विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम अविरतपणे करीत आहे. 


"ड्रॉइंग क्‍लास'चे रौप्य महोत्सवात पदार्पण 
1993 पासून "कला-शाळा' या ड्रॉइंग क्‍लासची स्थापना केली. आज या क्‍लासचे 25 व्या वर्षात पदार्पण केले असून, क्‍लासतर्फे विविध माध्यमातून हा वर्ष साजरे केले जात आहे. यात त्यांच्या विद्यार्थ्यांनी काढलेले चित्रांचे प्रदर्शन भरविले जात आहे. 


राष्ट्रपतींच्या हस्ते शिष्याला पुरस्कार 
भाटे सरांची शिष्या सोनल जावळे यांनी स्वस्त घरकूल मॉडल स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावला होता. दिवंगत राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते सोनलला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. बंगळूर येथे एका मोठ्या महाविद्यालयात ती शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. 


घडविलेले विद्यार्थी चांगल्या पदावर 
श्री. भाटे यांच्या कला शाळेत ऑकिटेक्‍चरपासून ते कला क्षेत्रातील परीक्षांचे शिक्षण देतात. त्यांनी गेल्या पंचवीस वर्षांत दहा हजार विद्यार्थी घडविले आहेत. यात संग्राम सोनी हा मुंबईला "ऑर्ट डायरेक्‍टर' म्हणून आहे. दिनेश खैरनार ऍड एजन्सीमध्ये आहे. नम्रता फिरके या ऑस्ट्रेलिया येथे कलाशिक्षक, तसेच स्वप्नील राका हा विदेशातील ऑर्किटेक्‍चर कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com