उन्हाच्या तडाक्‍यात पशू, पक्ष्यांना आधार गळक्‍या जलवाहिन्यांचा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 एप्रिल 2017

विराणे - तालुक्‍यात उन्हाचा पारा २० दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढला आहे. माळमाथ्यात तर उन्हाच्या झळा तीव्र आहेत. परिसरातील विहिरींनी कधीच तळ गाठला; तर अनेक विहिरी कोरड्या झाल्या. गावोगावचे पाणीसाठे कोरडे झाले आहेत. याचा परिणाम पशू-पक्ष्यांवर झाला असून, पाण्यासाठी त्यांना भटकंती करावी लागत आहे. माळरानावर फिरणाऱ्या पशूंना तसेच पक्ष्यांना वाहिन्यांतून गळणाऱ्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. 

गावोगावी विविध पाणीपुरवठा योजनांच्या तसेच शेतकऱ्यांच्या पाइपलाइन गेल्या आहेत. यातील काही वाहिन्यांतून नेहमीच पाणी गळत असते. या वाहिन्या काही ठिकाणी गळक्‍या आहेत; तर ठिकठिकाणी या वाहिन्यांतून हवा निघावी म्हणून एअरवॉल बसविण्यात आले आहेत. पाणी वाहते तेव्हा वाहिन्यांतून पाणी गळत असते. माळरानावर पशूंना चारण्यासाठी जाणाऱ्या गुराख्यांना सर्वत्र जलसाठे कोरडे पडल्याने पाण्याची शोधाशोध करावी लागते. पशूपालक वाहिन्यांतून गळणारे पाणी इतरत्र वाहून जाऊ नये म्हणून खड्डे करून पाणी एकाच ठिकाणी साठवत आहेत. या साठविलेल्या पाण्यावर भर दुपारच्या उन्हात छोटे-मोठे पाळीव प्राणी आपली तहान भागवत आहेत. 

पक्ष्यांनाही पाणी शोधताना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करावे लागत आहे. सकाळी, सायंकाळी या जलसाठ्यात पक्षी आपली तहान भागविताना दिसत आहेत. पायपीट करणारे वाटसरू, फेरीवाले या गळक्‍या वाहिन्यांवर तहान भागवत तृप्त होत आहेत. या वाहिन्यांतून गळणाऱ्या पाण्याचा अपव्यय दिसत असला तरी अनेक पक्षी, प्राणी यावरच तहान भागवत आहेत.

Web Title: Leaky water pipes supporting the birds

टॅग्स