कांद्याला किमान दोन हजार रुपये 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 मार्च 2017

नाशिक - गेले दीड वर्षापासून कांद्याचे दर सातत्याने कोसळत असल्याचा मुद्दा आज खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण यांनी संसदेच्या शून्यप्रहरात उपस्थित केला. कांद्याला क्विंटलला दोन हजार रुपये किमान आधार भाव द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. 

खासदार चव्हाण म्हणाले, की कांदा हे जिरायती शेतकऱ्यांचे एकमेव नगदी पीक आहे. परंतु, त्याच्या दरातील अस्थिरतेमुळे तो शेतकऱ्यांना सातत्याने रडवत असतो. यामुळे कांद्याला किमान आधारभूत दर दोन हजार रुपये देण्याची गरज आहे. ते म्हणाले, की दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील शेतकरी कांद्याचे उत्पादन करतो. गेल्या काही वर्षांत शेतकऱ्यांना कांदा उत्पादनाला लागणारा खर्चही मिळत नाही. त्यामुळे कांद्याला दोन हजार रुपये किमान आधारभूत दर मिळण्याची गरज आहे. कांद्याची निर्यात वाढविण्यासाठी सध्याचे कांदा निर्यातीचे अनुदान पाच टक्‍क्‍यांवरून वाढवून ते 15 टक्के, तर कांदा अनुदानाची मुदत 31 मार्चला संपत असून ती वाढविण्याचीही मागणी त्यांनी केली.