मूल दत्तक घेणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना विशेष रजा

mantralay.
mantralay.

इगतपुरी- एक वर्षाआतील वयाचे मूल दत्तक घेणाऱ्या राज्य शासकीय महिला कर्मचाऱ्यांना 180 दिवसांची भरपगारी विशेष रजा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. राज्यातील सर्व कृषी व बिगरकृषी विद्यापीठे, त्यांच्याशी संलग्न महाविद्यालये, तसेच शासकीय व अनुदानित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संस्थांमधील पूर्णवेळ शिक्षक व शिक्षकेतर महिला कर्मचाऱ्यांनाही या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. 

पूर्वी अनाथालय किंवा अनाथाश्रमांमधून मूल दत्तक घेणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना 90 दिवसांची विशेष रजा दिली जात होती; परंतु अनाथालयातून किंवा अनाथाश्रमातून मूल दत्तक घेणे आणि स्वत:चे मूल नसणे या दोन्ही अटी आता रद्द करण्यात आल्या. आता दोनपेक्षा कमी अपत्ये असलेल्या महिला कर्मचाऱ्याने मूल दत्तक घेतले, तरी तिला विशेष रजेचा लाभ मिळणार आहे.

द्र सरकारने अलीकडेच मूल दत्तक घेणाऱ्या शासकीय महिला कर्मचाऱ्यास प्रसूती रजेप्रमाणे 180 दिवस मुलाच्या संगोपनासाठी विशेष रजा देण्याचा निर्णय घेतला. त्याच धर्तीवर वित्त विभागाने या संदर्भातील आदेश 15 मार्चपासून जारी करण्यात आला. सेवा दोन वर्षांपेक्षा कमी असलेल्या महिला कर्मचाऱ्यांची झाली आहे, अशा महिलांनी मूल दत्तक घेऊन विशेष रजेचा लाभ घेतला असल्यास त्यांना शासनाची दोन वर्षे सेवा करणे बंधनकारक राहणार आहे. 

असा आहे निर्णय 
दत्तक घेण्याच्या तारखेस मुलाचे वय एक वर्षाच्या आत असेल तर महिला कर्मचाऱ्यांना 180 दिवसांची विशेष रजा मिळणार आहे. एक वर्षापेक्षा जास्त व तीन वर्षांपेक्षा कमी वय असलेले मूल दत्तक घेतल्यास 90 दिवसांच्या रजेचा लाभ मिळेल. आधीच्या निर्णयाप्रमाणे ज्या महिला दत्तक मूल घेतल्याच्या कारणास्तव 90 दिवसांच्या रजेवर आहेत आणि त्या मुलाचे वय एक वर्षाच्या आत असेल, तर अशा महिलांनाही आणखी 90 दिवसांची वाढीव विशेष रजा मिळेल, असे या आदेशात नमूद करण्यात आले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com