पूरग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय मदत द्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 ऑगस्ट 2016

नाशिक - अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून त्वरित मदत द्यावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्हाधिकाऱ्यांसह तालुकावार तहसीलदारांना निवेदने दिली.

नाशिक - अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून त्वरित मदत द्यावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्हाधिकाऱ्यांसह तालुकावार तहसीलदारांना निवेदने दिली.

जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार, माजी खासदार देवीदास पिंगळे, प्रदेश चिटणीस अर्जुन टिळे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विजयश्री चुंभळे, पंचायत समितीच्या सभापती मंदा निकम, कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, तालुकाध्यक्ष तानाजी गायधनी, दिलीप थेटे, मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष नितीन मोहिते, युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, सोमनाथ बोराडे, साहेबराव पेखळे, महेश भामरे, महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षा लीलाबाई गायधनी, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब म्हस्के आदींच्या नेतृत्वाखाली निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना निवेदन दिले.

गेल्या वर्षीचा दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपिटीने पिके वाया गेल्याने अडचणीतील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने नुकसान झाले आहे. मात्र, त्याचे संथगतीने पंचनामे सुरू आहेत. त्यामुळे सरसकट पंचनामे करून शासनाने शेतकऱ्यांना मदत करावी. पिके, पेरण्या वाया गेलेल्या ठिकाणी शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी मोफत बियाणे व खते द्यावीत. अत्यल्प पाऊस झालेल्या ठिकाणी शेतकऱ्यांना अनुदान द्यावे आदी मागण्या निवेदनात आहेत.

निवृत्ती कापसे, भाऊसाहेब खांडबहाले, अरुण काळे, विलास कांडेकर, रमेश कहांडळ, सुरेश पिंगळे, मदन गायकवाड, रामदास पिंगळे, रतन गायकवाड, रामदास निकम, अंकुश भोर, भास्कर म्हैसधुणे, नाना वायतळे, कोमल साळवे, अनुजा आव्हाड, जया जाधव, वर्षा साळवे, प्रमोद थोरे, ज्ञानेश्‍वर म्हस्के, चंद्रभान म्हस्के, तुकाराम खांडबहाले, रत्नाकर चुंभळे, नामदेव गायधनी, मोतीराम ढेरिंगे, देवीदास भालेराव, निखिल भागवत, रोहित कटाळे, गोरख कोंबडे, संजय चांदगुडे व कार्यकर्ते उपस्थित होते.