महाबॅंकेच्या कामकाजाविरोधात लखमापूरला ग्राहकांचा ‘रास्ता रोको’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जानेवारी 2017

लखमापूर - महाबॅंकेच्या कामकाजाबाबत तक्रार करत ग्राहकांनी दुपारी सटाणा रोडवर ‘रास्ता रोको’ केले. बॅंकेचे व्यवस्थापक सागर वाघेला यांनी कामकाजात सुधारणा करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

लखमापूर - महाबॅंकेच्या कामकाजाबाबत तक्रार करत ग्राहकांनी दुपारी सटाणा रोडवर ‘रास्ता रोको’ केले. बॅंकेचे व्यवस्थापक सागर वाघेला यांनी कामकाजात सुधारणा करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

तीन दिवसांपासून महाबॅंकेतील संगणकीय यंत्रणेत बिघाड झाला आहे. या शाखेत लखमापूर, धांद्री, निंबोळा, चिंचावड, डोंगरगाव, महालपाटणे येथील ग्राहक आहेत. बाहेरगावाहून येऊन दिवसभर थांबून पैसे मिळत नसल्यामुळे या सर्व ग्राहकांनी आंदोलनाचा पवित्रा घेत सटाणा रोडवर ठिय्या मांडला. अचानक घडलेल्या प्रकारामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली. पोलिस निरीक्षक बशीर शेख, तहसीलदार सुनील सैंदाणे यांनी घटनास्थळी भेट देऊन आंदोलकाच्या समस्यावर चर्चा केली. बॅंकेचे व्यवस्थापक सागर वाघेला यांनी कामकाजात सुधारणा करण्याचे आश्‍वासन दिले. भाजप जिल्हा उपाध्यक्ष डॉ. विलास बच्छाव, शक्ती दळवी, विजय दळवी, सागर दळवी, विजय बच्छाव, माजी सरपंच सुशीला अहिरे यांनी मध्यस्थी करत आंदोलन मिटविण्यासाठी मदत केली.
 

तीन दिवसांपासून बॅंकेच्या संगणक यंत्रणेत बिघाड झाला आहे. त्यामुळे व्यवहार सुरळीत करता आले नाही. बऱ्याच व्यापाऱ्यांच्या खात्यावर पैसे नाहीत. त्यामुळे चेक क्‍लिअर होत नाही. आठवड्यात २४ हजार रुपये प्रत्येक ग्राहकाला देणार व एटीएम सेवा सुरळीत करण्यासाठी पाठपुरावा करणार आहे.
- सागर वाघेला, शाखा व्यवस्यापक, महाबॅंक
 

महिन्यापूर्वी कांदा व्यापाऱ्याने धनादेश दिला होता. परंतु, व्यापाऱ्यांच्या खात्यावर पैसेच नसल्यामुळे धनादेश वटला नाही. सर्वांत मोठी फसवणूक शेतकऱ्यांची होत आहे.
- बाळू दळवी, लखमापूर

उत्तर महाराष्ट्र

जळगाव - उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने यंदा संलग्न महाविद्यालये व विद्यापीठ प्रशाळेतील एम. एस्सी. प्रवेशासाठी प्रथमच केंद्रीय...

02.18 AM

मालेगाव - पहिल्या पत्नीला तलाक दिला नसताना दुसरा बेकायदा निकाह करणाऱ्या औरंगाबाद येथील मजहर खान या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल...

01.27 AM

रुग्णवाहिका नाकारली; मृतदेह तहसीलसमोर नांदगाव - सततची नापिकी आणि व कर्जबाजारीपणाला कंटाळून तालुक्‍यातील चांदोरा येथील नामदेव...

बुधवार, 23 ऑगस्ट 2017