‘कौशल्य विकास’च्या यादीतून महाराष्ट्र गायब

अरुण मलाणी
बुधवार, 9 नोव्हेंबर 2016

नाशिक - देशाला महासत्ता बनविण्यासोबत प्रत्येक हाताला रोजगार मिळवून देण्याची क्षमता कौशल्य विकास अन्‌ स्टार्टअपमध्ये आहे; परंतु इतर राज्यांच्या तुलनेत पुरोगामी असलेला आपला महाराष्ट्र पिछाडलेला असल्याचे चित्र आहे. स्टार्टअप इंडियाच्या संकेतस्थळावर महाराष्ट्राचा उल्लेख नाही. २०१५ मध्ये कौशल्य विकासात राज्यांच्या योगदानाच्या यादीतही महाराष्ट्र बेपत्ता आहे. प्रचंड क्षमता असूनही राजकीय इच्छाशक्‍तीमुळे ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा...’ असा प्रश्‍न विचारण्याची वेळ ओढावली आहे.

केंद्र सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता विकास विभागाच्या संकेतस्थळावर कौशल्य विकासासंदर्भातील बरीच माहिती उपलब्ध करून दिली आहे. त्यापैकी देशातील विविध राज्यांशी कौशल्य विकासासंदर्भात राबविलेले उपक्रमांविषयी यादी उपलब्ध करून दिली आहे. या यादीत २०१५ या वर्षात कौशल्य विकासासाठी केलेले सामंजस्य करार व अन्य उपाययोजनांचा समावेश आहे. अगदी पश्‍चिम बंगालपासून; तर केरळ, पंजाब, राजस्थान, हिमाचल प्रदेश, झारखंड, मध्य प्रदेश या राज्यांकडे काही ना काही सामंजस्य करार, उपक्रम राबविण्यात आला आहे. २०१५ मधील या उपक्रमांतून महाराष्ट्र राज्याचे नाव शोधून सापडत नाही. मोठ्या प्रमाणावर उद्योग क्षेत्र असून, कौशल्य विकासाच्या संदर्भात उपाययोजनांच्या संदर्भात राजकीय इच्छाशक्‍ती नसल्याने अशी वेळ ओढावतेय की काय, असा प्रश्‍न उपस्थित केला जातो आहे.