शेतकऱ्यांचे 12 जूनला राज्यभर धरणे आंदोलन, 13 जूनला रेल रोको

महेंद्र महाजन
गुरुवार, 8 जून 2017

रेल रोको आंदोलनानंतर पुन्हा शेतकरी समन्वय समितीची बैठक घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे. दरम्यान, एका महिलेने आंगतुकपणे बैठकीत बोलण्याचा प्रयत्न केला. राजू शेट्टी आणि बच्चू कडू हे तर सरकारमधील नेते आहेत. त्यांच्यावर माझा आक्षेप आहे असे त्या महिलेने सांगितले. 

नाशिक : शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारमधील मंत्र्यांना गावबंदी करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. तसेच, 12 जून रोजी राज्यातील तहसील कार्यालये आणि शासकीय कार्यालयांसमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. 

त्यानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी दुसऱ्या दिवशी म्हणजे 13 जून रोजी 'रेल रोको' आंदोलन करून आंदोलन करण्याचा निर्णय शेतकरी समन्वय समितीने घेतला आहे. नाशिकमध्ये शेतकरी समन्वय समितीची पूर्वबैठक नुकतीच पार पडली. राजू शेट्टी, अशोक ढवळे, बच्चू कडू, शेकापचे आमदार जयंत पाटील, किशोर ढमाले, नामदेव गावडे आदींची बैठकीला उपस्थिती

भाजप वगळता सर्वांचे सहकार्य
पहिल्या टप्प्यातील आंदोलन यशस्वी झाला असल्याचे शेतकरी प्रतिनिधींनी यावेळी सांगितले. सत्ताधारी भारतीय जनता पक्ष वगळता सर्व राजकीय पक्षांचे सहकार्य घेण्याचा निर्णय यावेळी शेतकऱ्यांनी घेतला आहे. 
रेल रोको आंदोलनानंतर पुन्हा शेतकरी समन्वय समितीची बैठक घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे. दरम्यान, एका महिलेने आंगतुकपणे बैठकीत बोलण्याचा प्रयत्न केला. राजू शेट्टी आणि बच्चू कडू हे तर सरकारमधील नेते आहेत. त्यांच्यावर माझा आक्षेप आहे असे त्या महिलेने सांगितले. 

उत्तर महाराष्ट्र

वणी (नाशिक): सप्तश्रृंगी गडावर नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेस आदिमायेचे दर्शनासाठी येणाऱ्या केळी रुम्हणवाडी (ता. अकोले) येथील...

08.00 PM

वणी (नाशिक) :  महाराष्ट्राचे आराध्य दैवत सप्तशृंग मातेच्या नवरात्रोत्सवास उद्या (गुरुवार) पासून उत्साहात सुरुवात होत असून,...

07.15 PM

नाशिक : गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजवून ध्वनी मर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले व उचच न्यायालयाने जामीन...

02.18 PM