बारावीच्या निकालात खानदेशात धुळ्याची बाजी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 मे 2018

खानदेशातून धुळे जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक लागला आहे. निकालात नाशिकसह नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्याच्या तुलनेत धुळे जिल्ह्याचा टक्का अधिक आहे. 

जळगाव - राज्याचा उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा (बारावी) निकाल आज दुपारी एकला शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर झाला. नाशिक विभागीय मंडळाचा एकूण निकाल 86.13 टक्के लागला. गेल्या वर्षीप्रमाणे यंदा देखील खानदेशातून धुळे जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक लागला आहे. निकालात नाशिकसह नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्याच्या तुलनेत धुळे जिल्ह्याचा टक्का अधिक आहे. 

यंदा या परीक्षेला नाशिक विभागातून 1 लाख 60 हजार 284 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 1 लाख 38 हजार 55 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एकूण निकाल 86.13 टक्के लागला. यात जळगाव जिल्ह्याचा 83.46 टक्के, नंदुरबारचा 83.37 तर, सर्वाधिक धुळे जिल्ह्याचा 88.57 टक्के निकाल लागला आहे. विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका संबंधित महाविद्यालयात 12 जूनला दुपारी तीनला वितरित करण्यात येणार आहे. 
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Maharashtra State Board HSC Result And Dhule Top In Khandesh