मतदार याद्यांबाबत तक्रारींचा निपटारा अंतिम टप्प्यात 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 एप्रिल 2017

मालेगाव - महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक 12 एप्रिलनंतर केव्हाही जाहीर होण्याची शक्‍यता आहे. प्रारूप मतदार याद्यांवर ऑनलाइन 212 व ऑफलाइन 78 हरकती घेण्यात आल्या होत्या. प्रभाग अधिकारी व पर्यवेक्षक हरकतींबाबत चौकशी करीत आहेत. सदर काम अंतिम टप्प्यात आहे. 

प्रारूप मतदार यादी जाहीर झाल्यानंतर हरकतींसाठी निर्धारित कालावधीव्यतिरिक्त दोन दिवसांची मुदत वाढवून देण्यात आली होती. या वेळेत काम पूर्ण होण्याची शक्‍यता कमी असल्याने आयोगाने मालेगावसह तीन महापालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला नाही. 

जवळपास 15 ते 20 दिवस निवडणूक कार्यक्रम लांबल्याने प्रभाग अधिकारी प्रत्येक तक्रारीची शहानिशा करीत आहेत. निवडणूक आयोगाने सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. यानुसार 12 एप्रिलला मतदान केंद्रांची यादी, तर 18 एप्रिलला मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. 12 एप्रिलनंतर महापालिका निवडणूक जाहीर होऊ शकेल. मार्चअखेरीस पारा 43 अंशांवर गेल्याने एप्रिल-मेमधील निवडणूक सर्वच उमेदवारांच्या दृष्टीने ताप देणारी ठरणार आहे. 

घरपट्टी विभागाला दिलासा 
महापालिका निवडणुकीसाठी घरपट्टी विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी मतदार याद्यांच्या कामात व्यस्त होते. यामुळे यंदा घरपट्टी वसुलीवर मोठा परिणाम अपेक्षित होता. आयोगाने निवडणूक कार्यक्रम लांबविल्याने घरपट्टी विभागाला दिलासा मिळाला. विभागातील कर्मचारी 15 दिवसांपासून घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीचे काम करीत आहेत.