तलाक न देता दुसरा निकाह करणाऱ्यासह सात जणांवर गुन्हा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 ऑगस्ट 2017

मालेगाव - पहिल्या पत्नीला तलाक न देता बेकायदा दुसरा निकाह करणाऱ्या औरंगाबाद येथील मजहर खान याच्यासह सात जणांविरुद्ध पवारवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. येथील प्रथम वर्ग न्यायाधीश श्रीमती एम. डी. कांबळे यांच्या न्यायालयाने मजहरची पत्नी शाहीनबानो यांच्या याचिकेवर निर्णय देताना पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. 

यानंतर काल रात्री शाहीनबानोच्या तक्रारीवरून मजहर खान, त्याची दुसरी पत्नी रुक्‍साना, सद्दरखान पठाण, फतेहपूर येथील जामा मशिदीचे सलीम काझी, यासीन खान, नथ्थू शेख व फिरोज खान या सात जणांविरुद्ध बेकायदा विवाह करून फसवणूक, पत्नीला मारहाण व तिच्या माहेरच्या कुटुंबीयांवर हल्ला, शिवीगाळ व दमबाजी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. शाहीनबानो हिचा विवाह 9 वर्षांपूर्वी मजहरशी झाला. चार अपत्य झाल्यानंतर मजहरने शाहीनबानोकडे पैशांची मागणी करत तिला घरातून हाकलून दिले. यानंतर त्याने रुक्‍साना हिच्याशी बेकायदा विवाह केला.