शिक्षकाच्या मृत्यूप्रकरणी निवृत्त सैनिकाला अटक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

मालेगाव - तुळजाई कॉलनी भागात गाडी पार्क करण्याच्या किरकोळ वादातून शिक्षक सुरेश काळे यांना शिवीगाळ व कोयता घेऊन अंगावर धावून जाणे व हवेत गोळीबार केल्याचा धसका घेतल्यानेच वडील सुरेश काळे यांचा मृत्यू झाल्याची तक्रार त्यांचा मुलगा देवेंद्र काळे (वय 23) याने कॅंप पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी या प्रकरणी मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरून माजी सैनिक किशोर शेवाळे याला अटक केली. त्याला न्यायालयात उभे केले असता, चार दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली. काल (ता. 9) सायंकाळी किरकोळ बाचाबाचीतून झालेल्या वादात आघार खुर्द येथील समता विद्यालयाचे शिक्षक सुरेश काळे यांच्या भांडणाचा धसका घेत हृदयविकाराने निधन झाले. तत्पूर्वी काळे व शेवाळे कुटुंबीयांमध्ये वाद झाला होता.