बाजारभावाप्रमाणे दर लावा मल्टीप्लेक्समधील खाद्यपदार्थाबाबत मनसेतर्फे निवेदन

manse.jpg
manse.jpg

सिडको(नाशिक) : शहरातील मल्टीप्लेक्समध्ये खाद्यपदार्थ हे बाजार भावापेक्षा आव्वाच्या सव्वा दराने जास्त दराने विकले जातात. या खाद्यपदार्थांना बाजार भावाप्रमाणे दर लागू करण्यात यावे अन्यथा मनसेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. कॉलेजरोड येथील पीव्हीआर मल्टीप्लेक्सच्या व्यवस्थापक सचिन चौधरी यांना आज हे निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, बाहेरील खाद्यपदार्थ मल्टीप्लेक्स नेण्यास परवानगी देऊनही त्यास मल्टीप्लेक्स मध्ये खाद्यपदार्थ नेण्यास बंदी आहे. प्रेक्षकांना बाहेरील खाद्यपदार्थ थिएटरमध्ये नेण्यास बंदी असेल तर मल्टीप्लेक्समधील खाद्यपदार्थांची विक्री का थांबवत नाही यापूर्वी खंडपीठाने थिएटर मालक तसेच राज्य सरकारला याबाबत सुनावले होते . एवढेच नव्हे तर अवाचे सवा दराने विकले जाणारे हे पदार्थ सामान्य दरात विकले गेले पाहिजेत, असे मतही खंडपीठाने व्यक्त केले आहे.मल्टीप्लेक्समध्ये खाद्यपदार्थ काही प्रोडक्ट छापील किंमती असतात तर समोसा, पॉपकॉर्न व इतर खाद्यपदार्थ हे बाजार भावापेक्षा आवाच्यासव्वा दराने आपल्या मनमानीने जास्त दराने विकले जातात. तसेच बाहेरील खाद्यपदार्थ चित्रपटगृहात नेण्यास परवानगी देऊनही त्यास मल्टीप्लेक्स प्रशासनाकडून सुरक्षेचे कारण देत टाळाटाळ करण्यात येते. 

सामान्य नागरिक हे मल्टीप्लेक्समध्ये सिनेमा पाहण्यास गेल्यावर एकतर त्याला तिकिटाचे दर परवडत नाही त्यात तहान लागल्यास साधी पाण्याची बॉटल सुद्धा दुपटी तिपटीने विकली जाते. जर तिकीट दरात सर्विस टॅक्स घेतला जातो तर पाणी हि अत्यावश्यक सेवा असल्याने पाण्याची मोफत व्यवस्था का करण्यात येत नाही .मोफत पाण्याची व्यवस्था करण्यात यावी  व समोसा, पॉपकॉर्न ,पाणी बॉटल, कोल्ड्रिंक यांचे दर हे बाजार भावा प्रमाणे ठेवण्यात यावे  जर या मल्टीप्लेक्स व्यवस्थापनाने त्याची अंमलबजावणी केली नाही, तर येत्या काळात मनसेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. जर व्यवस्थापनाने त्याची अंमलबजावणी न केल्यास व आंदोलन झाल्यास  त्यात काही अपरीत घटना घडल्यास त्यास व्यवस्थापन जबाबदार असेल असे सांगितले गेले आहे.यावेळी निखील सरपोतदार, संदेश जगताप, आकाश पगार, सतिश गटकळ, रोहित कुलकर्णी, जितेंद्र जोशी,  प्रसाद देशमुख, किरण बेलेकर, रोहन जगताप, विक्की बिऱ्हाडे, रोहन कोकरे, विक्रांत देवरे आदि पदाधिकारी उपस्थित होते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com