औरंगाबादहून चोरलेली ट्रॅव्हल्स बस मालेगावात जप्त,एकाला अटक 

residentional photo
residentional photo

नाशिक : औरंगाबाद येथील सिडकोतील चोरी केलेली ट्रॅव्हल्स बस मालेगावमार्गे धुळ्याकडे जात असल्याची माहिती मिळताच नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या गस्तीपथकाने पाठलाग करून चिखलओहोळ (ता. मालेगाव) शिवारात पकडली. यात कवडगाव (जि. औरंगाबाद) येथील संशयिताला अटक करण्यात आली. 
नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गुरुवारी (ता. 12) रात्री नाशिक- धुळे महामार्गावर गस्त घालत होते. त्या वेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक करपे यांना औरंगाबाद शहरातून ट्रॅव्हल्स बस चोरून ती बस नांदगाव- मालेगावमार्गे धुळ्याकडे जात असल्याची माहिती मिळाली.

    स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबई- आग्रा महामार्गावरील चाळीसगाव चौफुली येथे सापळा रचला. रात्रीच्या सुमारास औरंगाबादकडून धुळ्याच्या दिशेने येणारी सफेद ट्रॅव्हल्स बसला (एमएच 05- 8573) पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला असता, चालकाने बस भरधाव पळवली. पथकाला संशय आल्याने त्यांनी पाठलाग करत चिखलओहोळ शिवारात बसला रोखले. संशयित चालक शेख अनिस शेख युसूफ (वय 25, रा. कवडगाव, ता. पैठण, जि. औरंगाबाद) याला ताब्यात घेत चौकशी केली असता, त्याने बस औरंगाबादच्या सिडकोतील एमजीएम हॉस्पिटल येथून चोरल्याची कबुली दिली. संशयिताला औरंगाबादच्या सिडको पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कामगिरी निरीक्षक करपेश, सहाय्यक निरीक्षक संदीप दुनगहू, सुनील अहिरे, वसंत महाले, राजू मोरे, सुहास छत्रे, राकेश उबाळे, फिरोज पठाण, रतिलाल वाघ व महामार्ग सुरक्षा पथकाने केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com